Satyaprem Ki Katha | ‘सत्यप्रेम की कथा’ने मारली बाजी, कियारा आणि कार्तिकची जोडी हिट, सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी…
सत्यप्रेम की कथा चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे सत्यप्रेम की कथा चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळताना दिसतोय. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची जोडी परत एकदा हिट ठरल्याचे बघायला मिळाले आहे. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत.
मुंबई : सत्यप्रेम की कथा हा चित्रपट सध्या धमाकेदार कमाई करताना दिसत आहे. विशेष म्हणजे बॉक्स ऑफिसवर (Box office) फक्त आणि फक्त सध्या सत्यप्रेम की कथा चित्रपटाची हवा आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या जोडीला प्रेक्षकांनी पुन्हा पसंत केल्याचे दिसत आहे. कार्तिक आर्यन (Karthik Aryan) आणि कियारा अडवाणी यांचा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. सत्यप्रेम की कथा चित्रपटाच्या कमाईमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सत्यप्रेम की कथा हा चित्रपट (Movie) 29 जून 2023 रोजी रिलीज झालाय. विशेष म्हणजे चित्रपटाची सुरूवातच जबरदस्त राहिली. ओपनिंग डेला चित्रपटाने 9.25 कोटींचे कलेक्शन हे बॉक्स ऑफिसवर केले.
सतत सत्यप्रेम की कथा चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे सत्यप्रेम की कथा चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी हे दिसले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा हिट ठरणारा हा दुसरा चित्रपट आहे.
विशेष म्हणजे आता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरलाय. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडच्या चित्रपटाकडे प्रेक्षक पाठ फिरवताना दिसत आहेत. यामध्ये आता सत्यप्रेम की कथा हा चित्रपट हिट ठरलाय. अजूनही सत्यप्रेम की कथा चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे.
सत्यप्रेम की कथा चित्रपटाला रिलीज होऊन 11 दिवस झाले असून 11 दिवसांमध्ये चित्रपटाने 66.06 कोटींचे कलेक्शन केले आहे. सत्यप्रेम की कथा चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन हे खुश असल्याचे बघायला मिळत आहे. पुढील काही दिवस चित्रपट चांगली कमाई करेल असे सांगितले जात आहे. रविवारी 11 व्या दिवशी सत्यप्रेम की कथा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 5.25 कोटींचे कलेक्शन केले.
काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 चित्रपटाला नकार दिला होता. त्यानंतर चित्रपट निर्मात्यांनी कार्तिक आर्यन याच्यासोबत संपर्क केला. मात्र, लगेचच अक्षय कुमार याने चित्रपटाला होकार दिला. कार्तिक आर्यन याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धमाका करताना दिसत आहेत. सत्यप्रेम की कथा चित्रपटाने धमाका केल्यानंतर कार्तिक आर्यन याने मुंबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे.