एकाच चित्रपटातून करत आहेत ‘हे’ 3 स्टार किड्स बाॅलिवूडमध्ये पदार्पण, नव्या पोस्टरमध्ये जबरदस्त लूकमध्ये दिसली शाहरुखची लेक
द आर्चीज हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. द आर्चीज या चित्रपटाची शूटिंग जवळपास पूर्ण झालीये. विशेष म्हणजे हा चित्रपट अत्यंत खास आहे. कारण या चित्रपटातून काही स्टार किड्स हे बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. आता या चित्रपटाविषयीचे मोठे अपडेट पुढे आले.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ‘द आर्चीज’ (The Archies) हा जोया अख्तरचा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून एक दोन नव्हे तर तब्बल तीनपेक्षाही अधिक स्टार किड्स हे बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. ही पहिलीच वेळ आहे की, एकाच चित्रपटात तीनपेक्षाही अधिक स्टार किड्स (Star Kids) बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले जाणार आहेत. या चित्रपटाची शूटिंग अंतिम टप्प्यात असल्याची देखील माहिती मिळत आहे. आता नुकताच द आर्चीज चित्रपटाचे नवे पोस्ट हे रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टमधील शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या लेकीचा लूक पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. या चित्रपटाची स्टोरी ही काही मित्रांच्या भोवती फिरताना दिसत आहे.
द आर्चीज चित्रपटातून शाहरुख खान याची लेक सुहाना खान, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा नातू अर्थात श्वेता बच्चन हिचा मुलगा अगस्त्य नंदा, श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी तसेच अभिनेत्री जान्हवी कपूर हिची लहान बहीण खुशी कपूर हे तीन स्टार किड्स या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसणार आहेत.
विशेष म्हणजे द आर्चीज चित्रपटात अजूनही काही स्टार किड्सचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अजून त्यांची नावे जाहिर झाली नाहीत. नुकताच रिलीज झालेल्या पोस्टमध्ये सुहाना खान ही जबरदस्त लूकमध्ये दिलत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नाहीये. ओटीटीवर होणार आहे.
द आर्चीज हा चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जाणार आहे. मात्र, अनेकांनी द आर्चीज चित्रपटावर टीका केलीये. कारण या चित्रपटातून तब्बल तीनपेक्षाही अधिक स्टार किड्स हे लाॅन्च केले जात आहेत. विशेष म्हणजे बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्यासाठी हे वर्षे अत्यंत खास आहे. कारण या वर्षीच त्याचा मुलगा आर्यन खान हा देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
दुसरीकडे सुहाना खान हिच्या चित्रपटाची शूटिंग देखील अंतिम टप्प्यात आहे. आता हा द आर्चीज चित्रपट नेमका काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांना नेपोटिझमचा मोठा फटका हा सातत्याने बसताना दिसत आहेत. त्यामध्येच आता हा स्पेशल स्टार किड्स हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच सुहाना खान हिच्या जाहिरातीचा फोटो गाैरी खान हिने सोशल मीडियावर शेअर केला होता. या पोस्टमध्ये सुहाना खान हिचे काैतुक करताना गाैरी खान ही दिसली होती. सुहाना खान ही देखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. बाॅलिवूड पदार्पणाच्या अगोदरच सुहाना खान हिची तगडी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.