मोठी बातमी! सलमान खानचा गेम करण्यासाठी आलेल्या आरोपींचे फोटो व्हायरल; कोण आहेत आरोपी?
सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चिंतेचे वातावरण बघायला मिळतंय. सलमान खान याच्या घरावर थेट गोळीबार करण्यात आला. सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. सलमान खानच्या सुरक्षेमध्येही मोठी वाढ करण्यात आलीये.
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर 14 एप्रिल 2024 रोजी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर प्रचंड खळबळ निर्माण झाली. सर्वात हैराण करणारे म्हणजे ज्यावेळी सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. गेल्या काही महिन्यांपासून सलमान खान याच्या घरावर फायरिंग करण्याचे प्लनिंग सुरू असल्याची देखील धक्कादायक माहिती पुढे आली. लॉरेन्स बिश्नोई याच्या भावाने या गोळीबाराची जबाबदारी घेतली. आता नुकताच पनवेल पोलिसांकडून या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आलीये. चार जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आलीये.
आता पनवेल पोलिसांकडून सलमान खान याच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. यांची नावे देखील प्रसिद्ध करण्यात आली आहेत. पनवेल शहर पोलीस ठाण्यास गुन्हा रजि नं. 287/2024 भादवि कलम 115, 120 (बी), 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यातील आरोपींनी सलमान खान याचा खून करण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत.
धनंजयसिंह तपेसिंह उर्फ अजय कश्यप, गौरव भाटीया उर्फ न्हायी, वस्पी खान उर्फ वसीम चिकना, झिशान खान उर्फ जावेद खान यांना अटक करण्यात आलेली आहे. धक्कादायक म्हणजे हे चारही जण थेट लॉरेन्स बिश्नोई याच्या संपर्कात होते. या चाैघांनी सलमान खान याच्या पनवेल फार्म हाऊसची अनेकदा रेकी केल्याची देखील धक्कादायक माहिती पुढे येतंय.
पोलिसांकडून या गुन्ह्याचा अधिक तपास देखील सुरू आहे. आता आरोपींची फोटो देखील व्हायरल झाली आहेत. आता यांचे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. सलमान खान हा त्याच्या पनवेल फार्म हाऊसवर असताना हे गोळीबार करण्याच्या तयारीत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सलमान खान हा फार्म हाऊसवर गेलाच नाही.
गेल्या काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. सलमान खान याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आलीये. लॉरेन्स बिश्नोई याने थेट एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, मी अजून स्वत: गॅंगस्टर मानत नाही. ज्यादिवशी मी सलमान खान याला जीवे मारेल, त्याचदिवशी मी स्वत:ला गॅंगस्टर मानेल.