Adipurush | आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा झटका, थेट कोर्टाने ओढले ताशेरे
आदिपुरुष चित्रपटाचा वाद काही कमी होताना दिसत नाहीये. आता थेट कोर्टाने आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांना खडेबोल सुनावल्याचे दिसत आहे. आदिपुरुष चित्रपटामध्ये प्रभास हा मुख्य भूमिकेत आहे. सुरूवातीला लोकांनी सैफ अली खान याच्या लूकचीही खिल्ली उडवल्याचे बघायला मिळाले.
मुंबई : आदिपुरुष हा चित्रपट (Movie) गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात सापडलाय. प्रभास हा आदिपुरुष चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे. आदिपुरुष चित्रपट सतत वादात अडकल्याचे बघायला मिळाले. आदिपुरुष चित्रपट रिलीज होऊन बरेच दिवस झाले असताना देखील वाद काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आता इलाहाबाद न्यायालयाने आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा झटका दिलाय. सेंसर बोर्डाला देखील न्यायालयाने जबाबदारी व्यवस्थित न निभावल्याचे म्हटले आहे. आदिपुरुष (Adipurush) चित्रपटाचे लेखक यांना दहा दिवसांमध्ये उत्तर देण्यासही सांगण्यात आलंय. आदिपुरुष चित्रपटातील काही डायलॉगवर लोकांनी आक्षेप घेतला.
लोकांचा सतत होणारा विरोध बघता चित्रपट निर्मात्यांनी काही डायलॉग हे चित्रपटातून काढण्याचा मोठा निर्णय घेतला. मात्र, तरीही लोकांचा विरोध हा कमी होताना दिसत नाहीये. सुनावणी दरम्यान कोर्टाने चित्रपटाचे लेखक मुंतशिर शुक्ला यांना नोटीस पाठवली आहे. यामुळे चित्रपट निर्मात्यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे.
विशेष म्हणजे न्यायालयाने पाठवलेल्या नोटीसला एक आठवड्यामध्ये उत्तर हे मुंतशिर शुक्ला यांना द्यावे लागणार आहे. न्यायायलाने सुनावणी दरम्यान म्हटले की, लोकांसाठी रामायण पूजनिय आहे. यामुळे काही गोष्टींना हात लावायला नाही पाहिजे. चित्रपटामध्ये भगवान हनुमानजी आणि माता सीतेला ज्याप्रमाणे दाखवले गेले आहे, ते कोणाच्याही लक्षात येत नाहीये.
एक विशेष बाब म्हणजे लोकांनी अजूनही त्यांचा संयम सोडला नाहीये. चित्रपट निर्मात्यांनी विषय फार गांर्भियाने घेतला नसल्याचे देखील कोर्टाने म्हटले आहे. आता एक प्रकारे मोठा झटका हा चित्रपट निर्मात्यांना बसल्याचे दिसत आहे. बाॅक्स आॅफिसवर चांगली कमाई करताना देखील आदिपुरुष चित्रपट दिसत आहे. आदिपुरुष चित्रपटामध्ये सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत आहे.
प्रभास आणि क्रिती आदिपुरुष चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले होते. मात्र, सैफ अली खान हा चित्रपटाच्या प्रमोशनपासून दूर होता. ओम राऊत यांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आदिपुरुष हा अत्यंत बिग बजेटचा चित्रपट आहे. चित्रपट तयार करण्यासाठी तब्बल 500 कोटींचा खर्च आलाय. नेपाळमधील काही शहरांमध्ये आदिपुरुष चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. माता सीतेला भारताची मुलगी चित्रपटात म्हटल्यामुळे नेपाळमध्ये विरोध हा केला जातोय.