Akshay Kumar | चक्क ‘OMG 2’साठी अक्षय कुमार याने घेतली इतकी फिस, चित्रपट निर्मात्याचा मोठा खुलासा

बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सध्या त्याच्या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. अक्षय कुमार याच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. अक्षय कुमार हा सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रिय दिसत आहे आणि आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

Akshay Kumar | चक्क 'OMG 2'साठी अक्षय कुमार याने घेतली इतकी फिस, चित्रपट निर्मात्याचा मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 5:33 PM

मुंबई : बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटामुळे तूफान चर्चेत आहे. 15 आॅगस्ट रोजी अक्षय कुमार याची ओह माय गॉड 2 हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे याच दिवशी सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट रिलीज झाला. हे दोन्ही चित्रपट (Movie) एकमेकांना जोरदार टक्कर देताना देखील दिसत आहेत. मात्र, सनी देओल याचा चित्रपट कमाईमध्ये खूप पुढे निघून गेला आहे. या तुलनेत अक्षय कुमार याच्या ओएमजी 2 ला म्हणावा तेवढा धमाका करण्यात नक्कीच यश मिळाले नाहीये.

मुळात म्हणजे अक्षय कुमार हा बाॅलिवूडचा असा एकमेंव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला तब्बल चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. कोट्यावधी रूपयांची कमाई अक्षय कुमार हा चित्रपटाच्या माध्यमातून करताना दिसतो. विशेष म्हणजे अक्षय कुमार हा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतोय.

काही दिवसांपूर्वीच अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की, अक्षय कुमार याने ओएमजी 2 चित्रपटासाठी तब्बल 35 कोटी रूपये फिस घेतली आहे. यानंतर आता ओएमजी 2 चित्रपटाचे निर्माता असित अंधरे यांनी मोठा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे असित अंधरे यांचे बोलणे ऐकून तुम्हाला नक्कीच मोठा धक्का हा बसू शकतो.

असित अंधरे यांनी म्हटले की, ओएमजी 2 चित्रपटासाठी अक्षय कुमार याने ऐवढी फिस घेतली तेवढी फिस घेतले हे सर्व चुकीचे आहे. असित अंधरे पुढे म्हणाले की, अक्षय कुमार याने ओएमजी 2 या चित्रपटासाठी काहीच फिस घेतली नाहीये. झिरो रूपये फिस अक्षय कुमार याने ओएमजी 2 चित्रपटासाठी घेतली आहे. तसेच चित्रपटाच्या बजेटबद्दल त्यांनी मोठा खुलासा केला.

ओएमजी 2 हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे ओएमजी 2 चित्रपटाने आतापर्यंत बाॅक्स आॅफिसवर 70 कोटींची कमाई केली आहे. आता काही दिवसांमध्येच ओएमजी 2 हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होईल, असेही सांगितले जात आहे. पुढील काही दिवसांमध्ये चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करेल, असे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत नाहीयेत. एका मागून एक असे अक्षय कुमार याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. अक्षय कुमार याचा काही दिवसांपूर्वीच सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अक्षय कुमार हा दिसला होता. मात्र, तरीही हा चित्रपट फ्लाॅप गेला.

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.