प्रभास याला घाबरला शाहरुख खान? किंग खानचे एक पाऊल मागे, थेट डंकी चित्रपटाची…
शाहरुख खान याने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटांनी मोठा धमाका केला. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा जवान चित्रपट रिलीज झाला.
मुंबई : शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट (Movie) मोठा धमाका करताना दिसला. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. शाहरुख खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर पठाण चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये पुनरागमन केले. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय. शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाने देखील बाॅक्स आॅफिसवर मोठा धमाका नक्कीच केला.
शाहरुख खान याचा 2019 मध्ये झिरो हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही विशेष धमाका करण्यात यश मिळाले नाही. शाहरुख खान याचा झिरो चित्रपट फ्लाॅप गेला. झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर राहिला. शाहरुख खानचे चाहते सतत त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहताना दिसले.
Buzz: #SalaarVsDunki❌ #ShahRukhKhan‘s #Dunki likely to get POSTPONED.… pic.twitter.com/xWbDqHhioj
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) October 12, 2023
आता शाहरुख खान याच्या डंकी चित्रपटाबद्दल अत्यंत मोठे अपडेट हे पुढे आलंय. शाहरुख खान याचा डंकी आणि प्रभास याचा सालार हे चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार होते. यामुळे दोन्ही चित्रपटांना याचा फटका बसणार हे स्पष्ट होते. आता डंकी चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक अत्यंत मोठा निर्णय घेत एक पाऊल मागे घेतल्याचे दिसतंय.
शाहरुख खान याच्या डंकी चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये मोठा बदल करण्यात आलाय. रिपोर्टनुसार सालार हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी रिलीज होतोय. डंकी चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आल्याने चाहतेही हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. दुसरीकडे शाहरुख खान हा प्रभास याला घाबरल्याचे देखील सांगितले जातंय. आता प्रभासचा सालार चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.