मुंबई : द केरळ स्टोरी हा चित्रपट तूफान चर्चेत आहे. द केरळ स्टोरी (The Kerala Story) चित्रपट 5 मे रोजी रिलीज झाला. चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यापासूनच मोठ्या वादाला तोंड फुटले होते. सतत या चित्रपटाला विरोध केला जात होता. अनेकांनी तर थेट चित्रपटाच्या विरोधात कोर्टात धाव घेतली. दोन राज्यांमध्ये तर थेट चित्रपटावर बंदी देखील घातली गेली. द केरळ स्टोरी चित्रपट रिलीज झाल्यानंतरही वाद काही थांबला नाहीये. मात्र, असे असताना देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद हा चित्रपटाला मिळताना दिसतोय. द केरळ स्टोरी चित्रपट (Movie) बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाकेदार कमाई करताना दिसतोय. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर द केरळ स्टोरी आहे.
द केरळ स्टोरी चित्रपटाच्या सपोर्टमध्ये लोक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना देखील दिसत आहेत. विशेष म्हणजे रविवारी देखील चित्रपटाने तगडी कमाई केल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. द केरळ स्टोरी चित्रपटाबद्दल अजूनही प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. द केरळ स्टोरी चित्रपटामध्ये अदा शर्मा ही महत्वाच्या भूमिकेत आहे.
फक्त भारतामध्येच नाही तर अनेक देशांमध्ये द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज करण्यात आलाय. नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार मॉरिशसमध्ये द केरळ स्टोरी चित्रपट दाखवणाऱ्या थिएटर मालकाला धमकी देण्यात आली असून यामध्ये थिएटर उडवण्याची देखील धमकी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 40 देशांमध्ये द केरळ स्टोरी चित्रपट रिलीज झालाय.
या मिळालेल्या धमकीमुळे मॉरिशसमध्ये द केरळ स्टोरी चित्रपटाचे स्क्रीनिंग होणार की नाही, यावर प्रश्न उपस्थित केला जातोय. काही दिवसांपूर्वीच अभिनेते कमल हसन यांनी द केरळ स्टोरी चित्रपटावर टिका केली होती. कमल हसन यांने थेट द केरळ स्टोरी चित्रपट सत्यावर आधारित नसल्याच्या दावा केला होता. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला.
इतकेच नाही तर कमल हसन यांनी द केरळ स्टोरी चित्रपटाला प्रचार करणारा चित्रपट म्हटले होते. कमल हसन यांच्यानंतर लगेचच अनुराग कश्यप यांनीही द केरळ स्टोरी चित्रपटावर टिका केली. दुसरीकडे विवेक अग्निहोत्री यांनी मात्र, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत द केरळ स्टोरी चित्रपटाचे समर्थन केले होते. द केरळ स्टोरी चित्रपटाच्या स्टोरीवर सात वर्ष काम केल्याचे दावा निर्मात्यांकडून करण्यात आलाय.