मुंबई : द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत मोठ्या वादात अडकलाय. मुळात म्हणजे द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाचे टिझर रिलीज झाल्यानंतर मोठा वाद सुरू आहे. वादानंतर शेवटी हा चित्रपट 5 मे रोजी रिलीज झाला. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत अनेकांनी थेट कोर्टात याचिका दाखल केल्या. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी ही सातत्याने केली जात आहे. एकीकडे चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी तर दुसरीकडे चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळताना दिसतोय. द केरळ स्टोरी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाका करताना दिसत आहे. कमाईमध्ये द केरळ स्टोरी चित्रपटाने अनेक बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटांना मागे टाकले आहे.
द केरळ स्टोरी चित्रपटाची मोठी क्रेझ ही प्रेक्षकांमध्ये बघायला मिळत आहे. द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाचे समर्थन केले. विशेष म्हणजे दोन राज्यातील सरकारने मोठे निर्णय घेत चित्रपट थेट टॅक्स फ्री केला आहे.
द केरळ स्टोरी या चित्रपटावर दोन राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यात चित्रपटांवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर चित्रपट निर्मात्यांनी थेट मोठा निर्णय घेत कोर्टात धाव घेतली. यावर सुनावणी पार पडली असून कोर्टाने पश्चिम बंगाल राज्यात द केरळ स्टोरी चित्रपटावर घालण्यात आलेली बंदी उठवली आहे.
कोर्टाच्या निर्णयानंतर पश्चिम बंगाल सरकाराला अत्यंत मोठा झटका बसला आहे. या प्रकरणात सुनावणी करताना म्हटले की, पश्चिम बंगाल सरकारने 8 मे रोजी चित्रपटावर घातलेली बंदी उठवत आहोत, कारण या बंदीला कोणताही ठोस आधार हा दिसत नाहीये. म्हणजे काय तर आता परत एकदा पश्चिम बंगाल राज्यात द केरळ स्टोरी हा चित्रपट धमाका करताना दिसणार आहे. पश्चिम बंगालमध्ये चित्रपटाबद्दल क्रेझ प्रेक्षकांमध्ये आहे.
द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर कोची शहरातील थिएटर मालकांनी अचानक निर्णय घेत द केरळ स्टोरी या चित्रपटाचे शो बंद केले. पश्चिम बंगाल सरकारने अचानक द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. आता द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला असून पश्चिम बंगालमध्ये परत एकदा द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज होतोय.