Prithviraj Teaser Out | उलगडणार इतिहासातील सुवर्ण पान, बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज

अक्षय कुमारचा बहुचर्चित 'पृथ्वीराज' या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अक्षय कुमारला पृथ्वीराजच्या भूमिकेत पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. यशराज फिल्म्सच्या यूट्यूब चॅनलवर हा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

Prithviraj Teaser Out | उलगडणार इतिहासातील सुवर्ण पान, बहुचर्चित 'पृथ्वीराज' चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज
Prithviraj-Poster
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 3:21 PM

मुंबई : अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अक्षय कुमारला पृथ्वीराजच्या भूमिकेत पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. यशराज फिल्म्सच्या यूट्यूब चॅनलवर हा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

काय आहे टीझरमध्ये

या चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासातील एक सोनेरी पान पुन्हा सर्वांसमोर येणार आहे. या टीझरची सुरुवात पृथ्वीराज, चौहान यांच्या शौर्याची गाथा सांगून होतो.दरम्यान, सर्वोत्तम युद्ध दृश्ये पाहायला मिळतात. यामध्ये संजय दत्तही अक्षय कुमारप्रमाणे अॅक्शन करताना दिसत आहे. त्याच प्रमाणे सोनू सूदही एका वेगळ्या अवतारामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे . त्याचा लूक प्रेक्षकांची उत्सुकता वाढवू शकतो. याआधी सोनू सूद कधीही अशा लूकमध्ये दिसला नाही.

अक्षय कुमारची प्रतिक्रिया

अक्षय म्हणतो, “ही कथा इतिहासातील अभिमान आणि शौर्य आहे. महान योद्धा सम्राट पृथ्वीराज चौहान यांचे काम करायला मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे. यशराज फिल्म्सचा हा चित्रपट 21 जानेवारील चित्रपटतगृहांमध्ये पाहायला मिळेल असे लिहत अक्षय कुमारने त्याच्या सोशल मिडीयावर या चित्रपटाचे पोस्टर टाकले आहे. टिझर पाहून चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

मानुषीचा डेब्यू चित्रपट

सुंदर मानुषीने संयोगिताची भूमिका साकारली आहे. हा मानुषीचा पहिला चित्रपट आहे आणि 2022 च्या बहुप्रतिक्षित पदार्पणापैकी एक आहे. यशराज फिल्म्स निर्मित, पृथ्वीराजचे दिग्दर्शन डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. यांनी “चाणक्य” या सर्वात मोठ्या टेलिव्हिजन एपिक ड्रामाचे दिग्दर्शन केले आहे. हे महाकाव्य नाटक भारतातील सर्वात प्रभावशाली राजकीय रणनीतीकार चाणक्य यांच्या जीवनावर आधारित होते. याशिवाय द्विवेदी यांनी अनेक पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. पिंजर हा त्यांचा असाच एक गाजलेला चित्रपट आहे. पृथ्वीराज 21 जानेवारी 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा :

Mouni Roy : मौनी रॉयने व्हाईट ड्रेसमध्ये दाखवला बोल्ड अवतार, पाहा फोटो!

Raj kumar rao Wedding | राजकुमार राव-पत्रलेखाची ‘लगीनघाई’, अलिशान रिसॉर्टमध्ये घेणार सप्तपदी, हॉटेलचे एका दिवसाचे भाडे तब्बल…

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.