सलमान खान याला घाबरला टायगर श्रॉफ, थेट घेतला ‘हा’ अत्यंत मोठा निर्णय
सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. सलमान खान याच्या टायगर 3 चित्रपटाची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झालाय.

मुंबई : बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याचा काही दिवसांपूर्वीच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला. सलमान खान याच्या या चित्रपटातून श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिची लेक पलक तिवारी आणि बिग बाॅस फेम शहनाज गिल यांनी बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सलमान खान हा दिसला. सलमान खान याचा आता टायगर 3 हा चित्रपट भेटीला येणार आहे.
मुळात म्हणजे सलमान खान याच्या टायगर 3 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठे क्रेझ हे बघायला मिळत आहे. टायगर 3 हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक नक्कीच आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री कतरिना कैफ ही सलमान खान याच्यासोबत धमाका करताना दिसेल. सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते.
आज सलमान खान याच्या टायगर 3 चित्रपटाचा धमाकेदार असा टीझर रिलीज झालाय. या चित्रपटाचा मोठा जलवा हा बघायला मिळतोय. मात्र, टायगर 3 चा टीझर रिलीज झाल्याने टायगर श्रॉफ याचा चित्रपट गणपथ: ए हीरो इज बॉर्नच्या रिलीज डेटमध्ये मोठा बदल करण्यात आलाय. मुळात म्हणजे आज टायगर श्रॉफ याच्या चित्रपटाचा टीझर रिलीज होणार होता.
View this post on Instagram
टायगर 3 चा टीझर रिलीज झाल्यानंतर गणपथ: चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक पाऊल मागे घेत मोठे बदल केल्याचे दिसतंय. सलमान खान याच्या टायगर 3 चित्रपटाला गणपथ चित्रपटाचे निर्माते घाबरल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. टायगर श्रॉफ याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती आपल्या चाहत्यांसोबत नुकताच शेअर केलीये.
टायगर श्रॉफ याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आम्हाला भेटण्यासाठी तुम्हाला अजून थोडा वेळ थांबावे लागणार आहे, कारण आम्ही तुमच्यासाठी काही खास घेऊन येत आहोत. गणपथचा टीझर 29 सप्टेंबर 2023 रोजी येत आहे. 20 ऑक्टोबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता यावरून अनेक चर्चा या रंगताना दिसतात.