चित्रपटाच्या सेटवरच ‘या’ दोन प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये तुंबळ हाणामारी, एकीने दिली कानाखाली तर दुसरीने…
चित्रपटाच्या सेटवर बऱ्याचवेळा अशा काही गोष्टी घडतात की, ज्यानंतर सर्वजणच हैराण होतात. बऱ्याच वेळा आपण ऐकले असेल की, चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्रींमध्ये झालेले वाद आणि त्यानंतर त्याचे रूपांतर हे थेट हाणामारीमध्ये झालेले. प्रसिद्ध अभिनेत्रींमध्येही अशा घटना घडतात.
अभिनेत्री करीना कपूर खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. करीना कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. करीना कपूर ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. करीना कपूर सोशल मीडियावर सक्रिय दिसते. अभिनेत्री काही दिवसांपूर्वीच आपल्या दोन्ही मुलांसोबत आणि पती सैफ अली खान यांच्यासोबत विदेशात फिरण्यासाठी गेली होती. यावेळीचे काही खास फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घरी तैमूर, इब्राहिम अली खान आणि जेह यांना राखी बांधण्यासाठी सारा अली खान ही पोहोचली होती. याचे काही फोटोही व्हायरल होताना दिसले.
करीना कपूर आणि बिपाशा बसू यांनी चित्रपटात एकसोबत काम केले. मात्र, दोघींमध्ये चित्रपटाच्या सेटवरच जोरदार वाद झाला. हा वाद इतका जास्त वाढला की, चक्क अभिनेत्रींमध्ये हाणामारी देखील झाली. यानंतर बिपाशा बसू हिने मोठा निर्णय घेत करीना कपूर हिच्यासोबत चित्रपटांमध्ये अजिबात काम न करण्याचा निर्णय घेतला.
2001 मध्ये रिलीज झालेल्या ‘अजनबी’ चित्रपटाच्या सेटवर ही हाणामारी झाली. रिपोर्टनुसार करीना कपूर आणि बिपाशा या दोघीही चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत होत्या. दोघींमध्ये कपड्यांवरून वाद सुरू झाला. यानंतर हा वाद इतका जास्त वाढला की, दोघीही भांडणे करताना दिसल्या. रागाच्या भरात करीना कपूर हिने थेट बिपाशा हिच्या कानाखाली मारली.
करीना हिने बिपाशाच्या कानाखाली मारल्यानंतर वाद खूप जास्त वाढला. त्यानंतर बिपाशा हिने निर्णय घेतला की, काहीही झाले तरीही करीना कपूर हिच्यासोबत चित्रपटांमध्ये काम करायचे नाही. आतापर्यंतही बिपाशा हिने करीना कपूर हिच्यासोबत परत चित्रपटांमध्ये काम केले नाहीये. मात्र, यांच्या वादाची आताही चर्चा चांगलीच रंगते.
अजनबी चित्रपटामध्ये बिपाशा आणि करीना कपूरशिवाय अक्षय कुमार आणि बॉबी देओल हे देखील मुख्य भूमिकेत होते. गेल्या काही वर्षांपासून बिपाशा बसू ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. सध्या बिपाशा बसू ही आपल्या मुलीसोबत आणि पतीसोबत खास वेळ घालवताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही खास फोटोही सोशल मीडियावर शेअर करते.