एक किस…, गोविंदाच्या जावयाने फ्लाइंटमध्ये असे काही केले की, थेट…
बाॅलिवूड अभिनेता गोविंदा हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच गोविंदाची भाच्ची आरती सिंह हिचे लग्न झाले. विशेष म्हणजे मागील वाद विसरून गोविंदा हा या लग्नासाठी उपस्थित होता. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. सध्या गोविंदाचा जावई चर्चेत आलाय.
कोलकाता नाइट रायडर्स (KKR) हा IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. काल रात्री मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर केकेआरने पॉइंट टेबलमध्ये आपल्या नावासमोर Q हे साईन लावले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघ धमाकेदार कामगिरी करताना दिसतोय. विशेष म्हणजे कोलकाता नाइट रायडर्स संघाचा उपकर्णधार नितिश राणा याचा एक व्हिडीओ आणि काही फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी नितिश राणा हा धमाल करताना दिसतोय. हा व्हायरल होणारा व्हिडीओ विमानातील आहे.
नितिश राणा हा कोलकाता नाइट रायडर्सला उपकर्णधार आहे. मात्र, यंदाच्या सीजनला त्याने आतापर्यंत दोनच सामने खेळले आहेत. 23 एप्रिलला झालेल्या एका सामन्यादरम्यान त्याच्या हाताला जखम झाली. त्यानंतर नितिश राणा याला सामना खेळता नाही आला. आता नितिश राणा याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये तो हर्षित राणासोबत मजाक करताना दिसतोय.
यावेळी नितिश राणा हा हर्षितकडे फोकस करण्यास कॅमेरामॅनला सांगतो. यावर थेट हर्षित म्हणतो की, मस्त पंजाबी गाणे सुरू आहेत. वातावरण कसे मस्त थंड आहे. फ्लाइटही मस्त चालत आहे. यावर हर्षितला नितिश म्हणतो की, मग एक फ्लाइंग किस होऊन जाऊद्या. थेट फ्लाइटमध्येच नितिश राणा हा फ्लाइंग किस मागताना दिसतोय.
Harshit rana 😭😭 pic.twitter.com/ZIHGTyudLH
— Aniket (@anyyket) May 5, 2024
विशेष बाब म्हणजे नितिश राणा हा अभिनेता गोविंदा याचा जावाई आहे. नितिशची पत्नी साची मारवाह ही गोविंदाची भाची लागते. एकदा कपिल शर्माच्या शोमध्ये कृष्णा अभिषेक याने सांगितले होते की, साची त्याची बहीण लागते. याप्रमाणे नितिश राणा हा गोविंदाचा जावाई लागतो. त्यावेळी शोमध्ये नितिश राणा आणि साची हे देखील पोहचले होते.
नितिश राणा याने आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाची कप्तानी देखील सांभाळली. त्यावेळी संघाने 14 पैकी 6 सामने हे जिंकले होते. आता नितिश राणा याचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आलाय. नितिश राणा धमाकेदार खेळ खेळताना सामन्यात दिसतोय. मात्र, यंदा दुखापतीमुळे त्याला सामना खेळण्याची संधीच मिळाली नाहीये.