लग्नाला पाच दिवसच होताच सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल, झहीर इक्बालसोबत…
Sonakshi Sinha Video : सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले आहे. हेच नाही तर या लग्नासाठी सिन्हा कुटुंबियांचा विरोध असल्याचे सांगितले जात होते. शेवटी हे लग्न मुंबईमध्ये झाले आणि लग्नाच्यानंतर खास पार्टीचे आयोजनही करण्यात आले.
शत्रुघ्न सिन्हा यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. सिव्हील मॅरेज पद्धतीने यांनी लग्न केले. त्यानंतर एका मोठ्या पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. विशेष म्हणजे झहीर इक्बाल याच्यासोबत धमाल करताना सोनाक्षी सिन्हा दिसली. हेच नाही तर आपल्याच लग्नाच्या पार्टीत सोनाक्षी सिन्हाने खास डान्स देखील केला. सलमान, अनिल कपूर देखील या पार्टीसाठी उपस्थित होते.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला आता सहा दिवस झाली आहेत. त्यामध्येच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून एकच चर्चा जोरदार रंगताना दिसतंय. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे म्हणणे आहे की, सोनाक्षी सिन्हा ही प्रेग्नंट आहे. नुकताच सोनाक्षी आणि झहीर इक्बाल हे मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलला पोहोचले.
त्यानंतर चर्चा सुरू झालीये की, सोनाक्षी सिन्हा ही लवकरच बाळाला जन्म देणार आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, झहीर भाई तुमच्याकडून हिच अपेक्षा होती. दुसऱ्याने लिहिले की, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांना शुभेच्छा. तिसऱ्याने लिहिले की, मेडिकल टेस्ट, भलेही सोनाक्षी गर्भवती नसले मात्र ही चांगली बातमी नक्कीच आहे.
View this post on Instagram
अजून एकाने लिहिले की, अरे वा बाळाचे आगमन होत आहे, अच्छा यामुळेच वडिलांना न सांगता लग्नाच्या सर्व तयारी होत होत्या. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला पाच दिवस झाले असतानाच हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यामुळे विविध चर्चा सुरू आहेत. आलिया भट्ट हिने देखील रणबीर कपूर याच्यासोबत लग्न केल्यानंतर काही दिवसांमध्येच प्रेग्नंसीची घोषणा केली होती.
आता लवकरच सोनाक्षी सिन्हा ही देखील आपल्या प्रेग्नंसीची घोषणा करेल, असे सांगितले जातंय. मात्र, अजूनही प्रेग्नंसीबद्दल सोनाक्षी सिन्हा हिने काहीच भाष्य केले नाहीये. मात्र, हॉस्पिटलमधील व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा ही दिसते.