Video | इब्राहिम अली खान भडकला, सैफच्या लेकाचा राग पाहून चाहते हैराण, थेट म्हणाला, इकडे काय आहे हिरोईन तिकडे

सैफ अली खान याचा लेक इब्राहिम अली खान हा लवकरच बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. इब्राहिम अली खान याचे नाव गेल्या काही दिवसांपासून श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिच्यासोबत जोडले जात आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

Video |  इब्राहिम अली खान भडकला, सैफच्या लेकाचा राग पाहून चाहते हैराण, थेट म्हणाला, इकडे काय आहे हिरोईन तिकडे
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 10:00 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिचा नुकताच जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे सारा अली खान हिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळताना देखील दिसतोय. विशेष म्हणजे सारा अली खान हिच्यासोबत या चित्रपटात बाॅलिवूड अभिनेता विकी काैशल (Vicky Kaishal) हा देखील मुख्य भूमिकेत आहे. सारा अली खान आणि विकी काैशल यांच्या जोडीला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सारा अली खान आणि विकी काैशल या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत होते. आयपीएल मॅचपासून ते प्रत्येक शहरांमध्ये जाऊन सारा अली खान आणि विकी यांनी चित्रपटाचे प्रमोशन (Promotion) केले.

सारा अली खान आणि विकी काैशल यांच्या चित्रपटाला ओपनिंगही चांगलीच मिळालीये. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन झाले आहे. विशेष म्हणजे जरा हटके जरा बचके या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ हे बघायला मिळत आहे. पुढील काही दिवस चित्रपट धमाल करेल, असेही सांगितले जात आहे.

नुकताच मुंबईमध्ये सारा अली खान ही आई अमृता आणि भाई इब्राहिम अली खान यांच्यासोबत चित्रपट बघण्यासाठी गेली होती. याचे काही फोटोही सारा अली खान हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, सारा अली खान ही ज्यावेळी इब्राहिम याच्यासोबत थिएटरबाहेर येत होती, त्यावेळी एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

सारा अली खान, अमृता सिंह आणि इब्राहिम अली खान यांना पाहून पापाराझी यांनी त्यांच्या भोवती मोठी गर्दी केली. या गर्दीतून मार्ग काढत अमृता सिंह गाडीकडे गेल्या. मात्र, पापाराझीच्या गर्दीमध्ये सारा अली खान आणि इब्राहिम अली खान हे अडकले. यानंतर इब्राहिम अली खान हा गर्दीमधून मार्ग काढत होता. यावेळी पापाराझी यांच्यासोबत काही चाहत्यांनीही गर्दी केली.

गर्दीतून मार्ग काढत असताना इब्राहिम अली खान याला धक्काबुक्की झाली. यानंतर इब्राहिम अली खान याचा पार चांगलाच चढला. यावेळी पापाराझी यांच्यासोबत चाहत्यांसोबत त्याचा वाद झाला. सारा अली खान हिच्याकडे इशारा करत इब्राहिम अली खान म्हणाला की, तिकडे जा…तिकडे हिरोईन आहे. आता याचे काही व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.