Video | उर्फी जावेद हिला पाहून लहान मुलगा लागला ढसाढसा रडायला, व्हिडीओ तूफान व्हायरल, थेट…
उर्फी जावेद हे नाव कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नेहमीच उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसते.
मुंबई : उर्फी जावेद हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. उर्फी जावेद (Urfi Javed) हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीमधून मिळालीये. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे बघायला मिळतंय. उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे जोरदार टीका होते. मात्र, या होणाऱ्या टिकेचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर अजिबातच होत नाही.
उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो तूफान व्हायरल होतात. उर्फी जावेद हिने अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख नक्कीच मिळवलीये.
उर्फी जावेद कधी काय कपडे घालेल हे सांगणे फार जास्त कठीण आहे. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये उर्फी जावेद हिने चक्क सांगितले की, मी घरी कपडे न घालता फिरते. उर्फी जावेद हिचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. उर्फी जावेदने नुकताच मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे.
View this post on Instagram
नुकताच आता उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. यावेळी उर्फी जावेद ही अतरंगी स्टाईलमध्ये दिसत आहे. उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. उर्फी जावेद हिला पाहून एक लहान मुलगा जोरजोरात रडताना दिसत आहे. हाच व्हिडीओ व्हायरल होतोय.
उर्फी जावेद हिचा अतरंगी लूक पाहून तो मुलगा रडताना दिसतोय. यावेळी उर्फी जावेद साॅरी साॅरी म्हणताना दिसतंय. हा माझ्यामुळेच रडत असल्याचे सांगताना उर्फी दिसत आहे. उर्फी जावेद हाच व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, तो मुलगा उर्फीला जास्त घाबरल्याचे दिसतंय.