राष्ट्रपती राजवटीचा फटका नाट्यसंमेलनाला नाही, अद्याप संमेलन ठरलंच नाही : नाट्यपरिषद
राज्यात राष्ट्रपती राजवटीमुळे शतकमहोत्सवी नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं (President's rule affect on Natyasammelan). पण जी गोष्ट ठरलीच नाही, ती पुढे कशी जाणार असा सवाल नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी विचारला आहे.
मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवटीमुळे शतकमहोत्सवी नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं (President’s rule affect on Natyasammelan). पण जी गोष्ट ठरलीच नाही, ती पुढे कशी जाणार असा सवाल नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी विचारला आहे. नाट्यसंमेलनाची तारीख पुढे ढकलली जाणार असल्याची बातमी एका वृत्तवाहिनीनं चालवली, पण ही बातमी पूर्णपणे चुकीची असल्याचं प्रसाद कांबळी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलतांना स्पष्ट केलं.
मुळातचं नाट्य संमेलन कुठे करायचं, कधी करायचं, नाट्यसंमेलाध्यक्ष कोण? याबाबत काहीच ठरलं नसताना तारीख पुढे ढकलली आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. नाट्यपरिषदेची यावर बैठक अजून व्हायची आहे. त्यामुळे या गोष्टी अजून काहीच ठरल्या नाही. त्यामुळे अनुदान, इतर खर्च, घडोमोड़ी यावर आत्ताच चर्चा का करायची? आता नुकतीच राष्ट्रपती लागवट लागली आहे, पण नाट्यसंमेलन शक्यतो फेब्रुवारी किंवा त्यानंतर होत असतं. त्यामुळे त्याबद्दल आत्ताच भाष्य करणं योग्य नाही. एवढचं काय तर संमेलन राष्ट्रपती राजवटीमुळे पुढे जाते आहे, सत्ता स्थापनेला जेवढा उशीर होईल तेवढं संमेलन पुढे जाईल असं म्हणणं चुकीचं आहे. चुकीच्या बातम्या पेरल्यामुळे लोकांचा संभ्रम होतो. तसेच, तुमची विश्वासार्हता कमी होते, त्यामुळे कुठलीही शहानिशा न करता अशी बातमी चालवू नका, अशी विनंती प्रसाद कांबळी यांनी ‘टीव्ही 9’शी बोतलांना माध्यमांना केली.
100 व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मोहन जोशी आणि जब्बार पटेल या दोन मातब्बरांमध्ये चुरस आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्ष कोण असणार, शतक महोत्सवी नाट्यसंमेलन कुठे होणार, कधी होणार याबद्दल नाट्यपरिषद अधिकृत घोषणा कधी करते याकडे नाट्यप्रेमी तसेच रंगकर्मींचे लक्ष लागलं आहे.