तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत दयाबेन करणार पुनरागमन, टप्पू के पापा, ‘हा’ शब्द मिळणार परत एकदा ऐकायला
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका धमाका करताना दिसते. विशेष म्हणजे ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जबरदस्त असे मनोरंजन करताना दिसत आहेत. या मालिकेचा चाहतावर्ग हा अत्यंत मोठा आहे. आता तारक मेहता का उल्टा चश्माबद्दल अत्यंत मोठे अपडेट येत आहे. चाहत्यांमध्ये उत्साह आहे.
मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसतंय. या मालिकेबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. आता चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत दयाबेन पुनरागमन करणार असल्याचे सांगितले जातंय. विशेष म्हणजे याची तयारी देखील जेठालाल याने सुरू केलीये. सुंदरलाल हा अहमदाबादवरून मुंबईमध्ये येतो. सुंदरलाल हा जेठालाल याला सांगतो की, दयाबेन ही दिवाळीमध्ये गोकुळधाम सोसायटीमध्ये येणार आहे. हे ऐकून जेठालाल आनंदी झाल्याचे बघायला मिळते.
इतकेच नाही तर दयाबेन येणार असल्याचे कळाल्यापासून जेठालाल हा स्वागताच्या तयारीला देखील लागलाय. आता तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत दिवाळी एपिसोडला सुरूवात होणार आहे. आता रिपोर्टमध्ये असे सांगितले जातंय की, दिवाळी एपिसोडलाच दयाबेन ही मालिकेमध्ये पुनरागमन हे करेल. यामुळे चाहत्यांमध्ये नक्कीच मोठा उत्साह हा बघायला मिळतोय.
दयाबेन ही गेल्या काही वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेपासून दूर आहे. चाहते हे सतत दयाबेनच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. मात्र, दयाबेनच्या भूमिकेमध्ये दिशा वकानी हिच दिसणार की, अजून कोणी नवीन अभिनेत्री दिसणार यावर जोरदार चर्चा ही सातत्याने सुरू आहे. दयाबेनच्या भूमिकेसाठी तब्बल 200 ते 300 अभिनेत्रींचे आॅडिशन हे घेण्यात आले.
रिपोर्टनुसार दयाबेनच्या भूमिकेत दिशा वकानी हिच दिसणार आहे. मुळात म्हणजे प्रेग्नंसीमुळे दयाबेन ही मालिकेपासून दूर गेली होती. मात्र, त्यानंतर फिसमुळे दयाबेन ही मालिकेत पुनरागमन करणार नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता सर्वकाही व्यवस्थित असल्याचे सांगितले जात असून दयाबेन धमाका करताना दिसणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका मोठ्या वादात सापडल्याचे बघायला मिळतंय. अनेक कलाकारांनी मालिकेला कायमची सोडचिठ्ठी ही दिल्याचे बघायला मिळतंय. अनेकांनी तर थेट तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. हे प्रकरण थेट कोर्टात पोहचल्याचे देखील बघायला मिळाले आहे.