मुंबई नव्हे तर ‘या’ शहरात घेतला पूनम पांडे हिने शेवटचा श्वास, अंत्यसंस्काराबद्दल अत्यंत मोठे अपडेट
Poonam Pandey Death News : पूनम पांडे हिच्या निधनानंतर अनेक चर्चा या रंगताना दिसत आहेत. पूनम पांडे हिने आपल्या करिअरची सुरूवात ही बाॅलिवूड चित्रपटांपासून केलीये. पूनम पांडे ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तगडी कमाई पूनम पांडे ही करत असत.
मुंबई : अभिनेत्री पूनम पांडे हिचे गुरूवारी रात्री निधन झाले. पूनम पांडे हिच्या निधनाची बातमी ऐकल्यापासून सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. सुरूवातीला अनेकांना वाटले की, पूनम पांडे हिच्या निधनाची बातमी फक्त आणि फक्त अफवाच आहे. मात्र, त्यानंतर थेट तिच्या मॅनेजरकडून आणि बहिणीकडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती शेअर करण्यात आली. पूनम पांडे हिचे निधन गर्भाशयातील कॅन्सरमुळे झाले. मात्र, यापूर्वी कधीच पूनम पांडे हिने कॅन्सरबद्दल भाष्य केले नव्हते. हेच नाही तर तिच्या मित्र मैत्रिणींना देखील कॅन्सरबद्दल माहिती नव्हती.
पूनम पांडे हिचे निधन झाल्यानंतर एकच खळबळ निर्माण झाली. पूनम पांडे हिचे निधन नेमके कुठे झाले, याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. अनेकांनी म्हटले की, पूनम पांडे हिने तिच्या मुंबईतील घरीच शेवटचा श्वास घेतला. मात्र, मुंबईत नव्हे तर कानपूरमध्ये पूनम पांडे हिचे निधन झाले. शेवटचा श्वास पूनम पांडे हिने कानपूरमध्येच घेतला.
पूनम पांडे हिच्यावर अंत्यसंस्कार नेमका कुठे होणार याबद्दल संभ्रम बघायला मिळाला. मात्र, आता हे स्पष्ट झालंय की, पूनम पांडे हिच्यावर अंत्यसंस्कार हे कानपूरमध्येच केले जाणार आहेत. पूनम पांडे हिचे मूळगाव हे कानपूरच आहे. पूनम पांडे हिच्या निधनाच्या वेळी तिचे सर्व कुटुंबिय उपस्थित असल्याचे देखील सांगितले जात आहे.
अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूनम पांडे हिच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केल्याचे बघायला मिळतंय. पूनम पांडे ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. पूनम पांडे हिचे पर्सनल आयुष्य कायमच चर्चेत राहिले. पूनम पांडे हिचा पती सतत तिला मारहाण करत. हेच नाही तर तिला घराच्या बाहेर निघण्याची देखील परवानगी नसायची.
पूनम पांडे आणि तिच्या पतीमधील वाद थेट पोलिस ठाण्यात देखील पोहचला होता. पतीच्या विरोधात पूनम पांडे हिने तक्रार केली होती. पूनम पांडे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असत. पूनम पांडे ही नेहमीच बोल्ड फोटोशूट करत. अनेकदा फोटोंमुळे जोरदार टीका देखील पूनम पांडे हिच्यावर झालीये.