विश्वासच बसत नाहीये… लोकांना पूनम पांडे हिचा मृत्यू म्हणजे अफवा आहे असं का वाटतंय?
Poonam Pandey Death : पूनम पांडे हिच्या निधनानंतर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. पूनम पांडे हिने आपल्या करिअरची सुरूवात ही बाॅलिवूड चित्रपटांपासून केली. पूनम पांडे हिचे निधन झाल्याचे अनेक रिपोर्टमध्ये सांगितले गेले. मात्र, आता सतत विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
मुंबई : पूनम पांडे हिच्या निधनाच्या बातमीनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे दिसतंय. हेच नाही तर पूनम पांडे हिचे खरोखरच निधन झाले का? हा प्रश्न देखील सातत्याने विचारला जातोय. पूनम पांडे हिने आपल्या करिअरची सुरूवात बाॅलिवूड चित्रपटांपासून केली. पूनम पांडे मॉडेलिंग देखील करत. पूनम पांडे कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. पूनम पांडे हिचे निधन झाले ही अफवा असल्याचे अनेकांना वाटतंय. त्याचे कारणही तेवढेच मोठे आहे. पूनम पांडे हिच्या निधनाबद्दल मोठा संभ्रम हा बघायला मिळतोय.
पूनम पांडे हिच्या निधनाची बातमी सुरू असतानाच तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. ही पोस्ट पूनम पांडे हिच्या मॅनेजरकडून शेअर करण्यात आली. मात्र, ही पोस्ट पाहूनही अनेकांना अजूनही विश्वास बसत नाहीये की, पूनम पांडे हिचे निधन झाले.
अनेकांनी तर या पोस्टवर कमेंट करत थेट म्हटले आहे की, बहुतेक नेहमीप्रमाणे पूनम पांडे हिचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले. दुसऱ्याने लिहिले की, नक्कीच हिचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले. तिसऱ्याने लिहिले की, चर्चेत राहण्यासाठी हा प्रकार केलेला दिसतोय. अनेकांनी हा फक्त आणि फक्त स्टंट असल्याचे देखील म्हटले आहे.
पूनम पांडे हिच्या निधनाबद्दल देखील संभ्रम बघायला मिळतोय. पूनम पांडे हिचे निधन मुंबईमध्येच झाल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर असे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, पूनम पांडे हिचे निधन मुंबई नव्हे तर कानपूरमध्ये झाले. आता नुकताच आलेल्या अपडेटनुसार पूनम पांडे हिचे निधन पुणे येथे झाल्याचे सांगितले जातंय.
गर्भाशयातील कॅन्सरमुळे नाही तर पूनम पांडे हिने आत्महत्या केल्याचा दावा केला जातोय. मात्र, अजूनही हे कळू शकले नाही की, नक्की पूनम पांडे हिचे निधन कुठे झाले आणि तिच्यावर अंत्यसंस्कार हा नेमका कुठे होणार. हेच नाही तर पूनम पांडे हिचे निधन झालेच नसल्याचा देखील दावा केला जातोय. आता या प्रकरणात काही मोठे खुलासे हे होऊ शकतात.