Bigg Boss 17 | ‘बिग बॉस 17’च्या निर्मात्यांनी घेतला अत्यंत मोठा निर्णय, वाचा महत्वाचे अपडेट

बिग बॉस 17 बद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. बिग बॉस 17 ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत धमाल करताना दिसेल.

Bigg Boss 17 | 'बिग बॉस 17'च्या निर्मात्यांनी घेतला अत्यंत मोठा निर्णय, वाचा महत्वाचे अपडेट
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 10:32 PM

मुंबई : बिग बॉस 17 बद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. बिग बॉस 17 (Bigg Boss 17) ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस 17 काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार. बिग बॉस (Bigg Boss) 17 हे 15 ऑक्टोबर पासून धमाका करताना दिसणार आहे. बिग बॉस 17 मध्ये कोण सहभागी होणार याबद्दल दररोज मोठे खुलासे हे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 मध्ये ऐश्वर्या शर्मा ही आपल्या पत्नीसोबत सहभागी होणार हे जवळपास निश्चितच आहे.

बिग बॉस 17 मध्ये टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे ही आपला पती विकी जैन याच्यासोबत सहभागी होणार आहे. इतकेच नाही तर अंकिता ही सर्वात जास्त फिस घेणारी बिग बाॅस 17 मधील सदस्य आहे. बिग बॉस 17 मध्ये अंकिता ही काही मोठे खुलासे करण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेली सीमा हैदर ही सचिन मीना याच्यासोबत बिग बॉस 17 मध्ये सहभागी होऊ शकते. बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी सीमा हैदर हिच्यासोबत संपर्क साधल्याचे सीमाकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले. मात्र, सीमा हैदर ही बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार की नाही. याबद्दल काही खुलासा होऊ शकला नाहीये.

आता नुकताच बिग बॉस 17 बद्दल एक अत्यंत महत्वाचे आणि मोठे अपडेट हे पुढे आलंय. बिग बॉसच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच घडत आहे. बिग बॉस 17 मध्ये दाखल झाल्यानंतर सदस्यांचा बाहेरील जगाशी काहीच संबंध येत नाही. मात्र, यावेळी बिग बॉस 17 मध्ये धमाका होणार हे नक्की आहे. कारण घरातील सदस्यांना फोनच्या मदतीने त्यांच्या कुटुंबियांना बोलता येणार आहे.

इतकेच नाही तर बिग बॉस 17 च्या घरात एक मोठी स्क्रीन असणार आहे. त्याच स्क्रीनच्या मदतीने बिग बॉस 17 च्या स्पर्धेकांनी आपल्या कुटुंबियांसोबत संवाद हा साधता येईल. हा मोठा बदल या सीजनमध्ये बघायला मिळेल. यापूर्वी कधीच अशाप्रकारे कुठल्याही सीजनमध्ये झाले नाही. इतकेच नाही तर खूप महत्वाची गोष्ट असल्याशिवाय निर्माते घरातील सदस्यांना बाहेरील निरोप देखील देत नव्हते.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.