सैफ अली खान याला नेमकं काय झालं?; रुग्णालयातून मोठी अपडेट
बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान हा कायमच चर्चेत असतो. सैफ अली खान याचा काही दिवसांपूर्वीच आदिपुरूष हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. सैफ अली खान याच्याबद्दल नुकताच एक हैराण करणारी बातमी पुढे येताना दिसत आहे. यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान हा कायमच चर्चेत असतो. सैफ अली खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सैफ अली खान याच्याबद्दल एक मोठी बातमी पुढे येतंय. यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. सैफ अली खान याला रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. सैफ अली खान याच्या गुडघ्याला आणि खांद्याला दुखापत झालीये. यामुळेच त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. हेच नाही तर सैफ अली खान याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.
आज सकाळीच सैफ अली खान याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्याच्यासोबत करीना कपूर खान ही उपस्थित आहे. यानंतर त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. चाहते हे सतत सैफ अली खान याच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर त्याबद्दलच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत.
कशी आहे सैफ अली खान याची तब्येत, मोठे अपडेट
नुकताच रुग्णालयातून आलेल्या रिपोर्टनुसार सैफ अली खान याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया ही झाली आहे. तसेच आता सैफ अली खान याची तब्येत स्थिर आहे. यशस्वीपणे ही शस्त्रक्रिया झालीये. गुडघा आणि छातीला मोठी दुखापत सैफ अली खान याला झालीये. गुडघ्यावर तर शस्त्रक्रिया करण्यात आली.
यापूर्वीही 2016 मध्ये सैफ अली खान याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया ही करण्यात आलीये. सैफ अली खान याच्या शस्त्रक्रियेबद्दल ऐकल्यानंतर चाहत्यांमध्ये चितेंचे वातावरण हे बघायला मिळत आहे. सैफ अली खान याच्या खांद्याला देखील फ्रॅक्चर असल्याचे देखील रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. पुढील काही दिवस आता सैफ अली खान याच्यावर उपचार सुरू असतील.
शूटिंगदरम्यान सैफ अली खान याला ही दुखापत झाल्याची देखील माहिती मिळत आहे. मात्र, नेमक्या कोणत्या चित्रपटाची शूटिंग सैफ अली खान हा करत होता आणि त्याला दुखापत ही कधी झाली याबद्दल फार काही माहिती ही मिळू शकली नाहीये. मात्र, याबद्दल अजूनही करीना कपूर खान हिच्याकडून काहीही अपडेट देण्यात आले नाहीये.