दहापेक्षा अधिक अकाउंट, धर्माकडे झुकाव, ‘तारक मेहताच्या सोढी’चे बेपत्ता होण्याचे रहस्य अखेर..
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करणारा गुरुचरण सिंग हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. सोढी बेपत्ता झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर चाहते गुरुचरण सिंगसाठी सातत्याने प्रार्थना करताना दिसत आहेत.
तारक मेहता फेम गुरुचरण सिंग हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झालाय. तारक मेहता मालिकेत अनेक वर्षे गुरुचरण सिंगने सोढीची भूमिका साकारली. आजही लोक गुरुचरण सिंग याला सोढीच्या नावानेच ओळखतात. गुरुचरण सिंग हा 22 एप्रिलला मुंबईला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र, तो मुंबईला पोहचलाच नाही. हेच नाही तर दिल्लीच्या पालम परिसरातील एक सीसीटीव्हीमध्ये तो दिसला. त्याचे शेवटचे लोकेशन हे त्याच्या घराच्या अगदी जवळचे होते. गुरुचरण सिंग याला बेपत्ता होऊन इतके दिवस झाले, परंतू त्याच्याबद्दल काहीच माहिती हाती लागली नाहीये.
पोलिस हे गुरुचरण सिंग याचा शोध घेत आहेत. मात्र, या प्रकरणात अजून काहीच पुरावे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. सुरूवातीला गुरुचरण सिंग याचे अपहरण झाल्याचे देखील सांगितले जात होते. मात्र, काहीच पुरावे पोलिसांच्या हाती लागले नसल्याचे बघायला मिळतंय. गुरुचरण सिंग याचे कुटुंबिय हे खूप चिंतेत असल्याचे देखील बघायला मिळत आहे.
आता नुकताच एक अत्यंत हैराण करणारा खुलासा करण्यात आलाय. गुरुचरण सिंगचे दहापेक्षाही अधिक फायनेंसियल अकाउंट आहेत. हेच नाही तर गुरुचरण सिंगचे एकापेक्षा अधिक जीमेल अकाऊंट देखील आहेत. फक्त हेच नाही तर धर्माकडे त्याचा कल वाढल्याची देखील माहिती मिळताना दिसत आहे. गुरुचरण सिंगच्या मित्राने देखील हैराण करणारा खुलासा केलाय.
गुरुचरण सिंगच्या मित्राने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच त्याने पर्वतांमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता नुकताच करण्यात आलेल्या खुलाश्यामुळे लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. गुरुचरण सिंग हा स्वत:च बेपत्ता झाल्याची काही दिवसांपूर्वीच चर्चा रंगताना दिसली. गुरुचरण सिंग हा 22 एप्रिल 2024 पासून बेपत्ता आहे.
गुरुचरण सिंग याने 2020 मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका सोडली. त्याने वडिलांच्या तब्येची कारण देत मालिकेला रामराम केला होता. गेल्या काही दिवसांपासून गुरुचरण सिंग याची तब्येत देखील ठीक नसल्याचे सांगितले गेले. हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच तो रूग्णालयात दाखल झाला होता. चाहते हे सतत गुरुचरण सिंग याच्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.