Don 3 Actress | कियारा अडवाणी हिच्या हातून गेला ‘डॉन 3’, ही अभिनेत्री असणार जंगली बिल्लीच्या भूमिकेत
गेल्या काही दिवसांपासून डॉन 3 हा चित्रपट चर्चेत आहे. डॉन 3 चित्रपटाची एक मोठी क्रेझ ही चाहत्यांमध्ये बघायला मिळत आहे. नुकताच या चित्रपटाबद्दल मोठी घोषणा करण्यात आली, यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. डॉन 3 चित्रपटात रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत असणार आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून डॉन 3 (Don 3) हा चित्रपट तूफान चर्चेत आहे. डॉन 3 चित्रपटाचे निर्माता फरहान अख्तर यांनी मोठी घोषणा केली. मात्र, डॉन 3 मध्ये शाहरूख खान हा दिसणार नसल्याचे कळाल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. मात्र, फरहान अख्तरने (Farhan Akhtar) स्पष्ट केले की, हे पुढे घेऊन जायचे आहे. डॉन 1 मध्ये अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर डॉन 2 मध्ये शाहरूख खान आणि डॉन 3 मध्ये रणवीर सिंह. मात्र, शाहरूख खान यांच्या चाहत्यांनी फरहान अख्तर याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
आता हे स्पष्ट झाले आहे की, फरहान अख्तरच्या डॉन 3 चित्रपटामध्ये रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत आहे. मात्र, अजूनही अभिनेत्रीच्या नावाची घोषणा चित्रपट निर्मात्यांकडून करण्यात आली नाहीये. एका मुलाखतीमध्ये फरहान अख्तर याला चित्रपटाच्या अभिनेत्रीबद्दल मोठा प्रश्न विचारण्यात आला. यावर खुलासा फरहान अख्तरने केला.
डॉन 3 चित्रपटासाठी गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कियारा अडवाणी हिचे नाव जोरदार चर्चेत आहे. मात्र, कियाराच्या नावाबद्दल फरहान अख्तरला विचारण्यात आले तेंव्हा त्याने स्पष्ट केले की, मी एखादे नाव सांगावे आणि मला ते परत घ्यावे लागणार हे योग्य वाटत नाहीये. यामुळे मी काही दिवसांमध्ये अभिनेत्रीच्या नावाची घोषणा नक्कीच करेल.
आता काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, कियारा अडवाणी हिचा पत्ता डॉन 3 मधून कट झालाय. आता कियारा अडवाणी ऐवजी डॉन 3 चित्रपटामध्ये क्रिती सनॉन ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, कियारा अडवाणी हिला अचानकपणे चित्रपटातून बाहेरचा रस्ता का दाखवण्यात आला, यावर चर्चा रंगताना दिसत आहे.
क्रिती सनॉन ही डाॅन 3 चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा ऐकल्यापासून तिच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह हा बघायला मिळत आहे. कारण यापूर्वी कोणत्याच चित्रपटामध्ये क्रिती सनॉन आणि रणवीर सिंह हे स्क्रीन शेअर करताना दिसले नाहीत. लवकरच आता चित्रपट निर्मात्यांकडून क्रिती सनॉन हिच्या नावाची घोषणा ही केली जाऊ शकते.
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर क्रिती सनॉन हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला होता. या व्हिडीओमध्ये कृति सेनन ही जिममध्ये अत्यंत अवघड असा व्यायाम करताना दिसली. कृति सेनन हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होताना दिसला. क्रिती सनॉन हिची मोठी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.