अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्यामध्ये मोठा वाद, अभिनेत्रीने थेट…
बिग बॉस 17 ला धमाकेदार पद्धतीने सुरूवात झालीये. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. बिग बॉस 17 मध्ये मोठे हंगामे हे बघायला मिळत आहेत. बिग बॉस 17 मध्ये मोठे वाद बघायला मिळाले.
मुंबई : बिग बॉस 17 हे चांगलेच रंगात आल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्यामध्ये मोठा वाद झाल्याचे बघायला मिळतंय. अंकिता लोखंडे हिला थेट मनारा चोप्रा म्हणते की, तू घरात ग्रुप तयार करून राहत आहेस. यावेळी अंकिता आणि मनारा चोप्रा यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाली. ज्यामुळे बिग बॉस 17 च्या घरातील वातावरण चांगलेच गरम झाल्याचे बघायला मिळाले.
बिग बॉस 17 मध्ये मोठे वाद होताना दिसत आहेत. मुळात म्हणजे अंकिता लोखंडे ही ईशा हिच्यासोबत राहते हेच मुळात मनारा हिला अजिबात आवडत नाही. यामुळे यांच्यामध्ये वाद होतात. आता तर मनारा हिने अंकिता लोखंडे हिला तोंडावर खडेबोल सुनावले आहेत. पुढील काही दिवस बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे विरोधात मनारा चोप्रा असा सामना बघायला मिळू शकतो.
बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालीये. मात्र, बिग बाॅसच्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये वाद होताना दिसतोय. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वीच विकी जैन याने स्पष्ट केले की, मी तुझ्या मागे अजिबात फिरू शकत नाही. यावेळी अंकिता लोखंडे ही रडताना देखील दिसली.
View this post on Instagram
अंकिता लोखंडे हिचे म्हणणे आहे की, बिग बॉस 17 च्या घरात विकी जैन हा प्रत्येकाला बोलतो आणि वेळ देतो फक्त तिला नाही. बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी मोठी खेळी खेळलीये. बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेत. एका रूमच्या सदस्यांसाठी फक्त तीन तास गॅस दिला आहे. त्याच वेळामध्ये रूममधील सदस्यांना आपले जेवण तयार करून घ्यायचे आहे.
बिग बॉस 17 टीआरपीमध्ये मोठा धमाका करणार असल्याचे सांगितले जातंय. नुकताच बिग बॉस 17 चा पहिला विकेंडचा वार हा पार पडलाय. यावेळी सलमान खान याने घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावला. बिग बॉस 17 धमाल करताना नक्कीच दिसतंय. बिग बॉस 17 ची सुरूवात होऊन अजून 15 दिवस देखील झाले नाहीत.