लग्नानंतरही ‘या’ अभिनेत्रीला पत्नीचा दर्जा नाही, पतीच्या घरात तिचा नाकारलेला प्रवेश, आयुष्यावर झाला मोठा परिणाम
Actress life | अभिनेत्रीला प्रेम करणं पडलं महागात! तीन मुलांच्या बापासोबत लग्न, कधीच नाही मिळाला पत्नीचा दर्जा, आज एकटीच असं आयुष्य जगतेय बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री... कधीकाळी करत होती चाहते आणि अनेक सेलिब्रिटींच्या मनावर राज्य...
बॉलिवूड सेलिब्रिटी कायम त्यांच्या कामामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सेलिब्रिटी देखील उत्सुक असतात. सध्या अशा अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, जी फक्त अभिनय नाहीतर, डान्समध्ये देखील अव्वल होती. बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांसोबत तिने स्क्रिन शेअर केली. प्रोफेशनल आयुष्यात अभिनेत्री यशाच्या शिखरावर तर पोहोचली, पण आयुष्यात असा एक टप्पा आला जेव्हा अभिनेत्रीसोबत होत्याच नव्हतं झालं.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाहीतर, अभिनेत्री जया प्रदा आहेत. फार लहान असताना जया प्रदा यांनी करियरला सुरुवात केली. वयाच्या 13 व्या वर्षी जया प्रदा यांनी पहिल्या सिनेमात काम केलं. ज्यासाठी त्यांना 10 रुपये मिळाले होते.
तेलुगू सिनेविश्वात पदार्पण केल्यानंतर जयाप्रदा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि हिंदी सिनेसृष्टीतही यश मिळवलं. जया प्रदा लवकरच त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामिल झाल्या. जया प्रदा यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र यांसारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली.
जया प्रदा यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि यशाच्या शिखरावर पोहोचल्या. पण खासगी आयुष्यात मात्र त्यांना अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. बॉलिवूडमध्ये काम करत असताना जया प्रदा यांनी श्रीकांत नाहटा यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
जया प्रदा यांनी लग्न केलं. पण श्रीकांत नाहटा फक्त विवाहितच नव्हते तर, त्यांनी तीन मुलं देखील होती. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता श्रीकांत नाहटा यांनी जया प्रदा यांच्यासोबत लग्न केलं. त्यामुळे जया प्रदा यांना कधीच पत्नीचा दर्जा मिळाला नाही. लग्नानंतर जया प्रदा यांना सासरी प्रवेश देखील करता आला नाही…
श्रीकांत नाहटा यांच्यासोबत लग्न केल्यानंतर जया प्रदा यांच्या आयुष्यातील वाईट काळ सुरु झाला. खासगी आयुष्याचा परिणाम त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यावर देखील होऊ लागला… लग्नानंतर देखील जया प्रदा बॉलिवूडमध्ये काम करत होत्या. पण त्यांना सिनेमांमध्ये काम मिळणं देखील बंद झालं. अखेर त्यांनी बॉलिवूडचा निरोप घेतला आणि राजकारणात प्रवेश केला. पण राजकारणात देखील त्यांना यश मिळालं नाही. आज वयाच्या 61 व्या वर्षी देखील जया प्रदा एकट्याच आयुष्य जगत आहेत.