अभिनेत्री विवाहित पुरुषाच्या पडली प्रेमात, 10 वर्ष राहिले प्रेमसंबंध, मिळाला धोका, आज 52 व्या वर्षीही एकटीच
Actress Love Life : अभिनेत्रीच्या आयुष्यात दुःख, त्याग... 12 वर्ष मोठ्या आणि विवाहित पुरुषाच्या प्रेमात, 10 वर्ष दोघे राहिले लिव्हइन रिलेशनमध्ये, लग्नाची वेळ आल्यानंतर मात्र अभिनेत्रीला मिळाला धोका, आज पैसा, संपतीत सर्वकाही असूनही 52 व्या वर्षी एकटीच
झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा कायम एकमेकांसोबत होत असते. मोठ्या पडद्यावर कोणती जोडी चाहत्यांना आवडली तरी, रियल लाईफमध्ये देखील त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगताना दिसतात. असं देखील अनेकदा झालं आहे, सेलिब्रिटी विवाहित असताना देखील को-स्टारच्या प्रेमात पडले आहेत. असंच काही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं आहे. अभिनेत्री स्वतःपेक्षा 12 वर्ष मोठ्या विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली. दोघे 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये देखील राहिले. पण जेव्हा लग्नाचा प्रश्न आला, तेव्हा अभिनेत्याने पत्नी आणि मुलांसाठी अभिनेत्रीची साथ सोडली. आज ती अभिनेत्री 52 वर्षांची असून एकटीच आयुष्य जगत आहे.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री तब्बू आहे. तब्बू आजही सिनेमांमुळे चर्चेत असते. पण एक काळ असा होता, जेव्हा तब्बू खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. तब्बू आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली होती. रियल लाईफमध्ये देखील दोघांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली होती.
तब्बू – नागार्जुन यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण 10 वर्ष एकत्र राहिल्यानंतर नात्याचा झालेला अंत फार वाईट होता. तब्बू – नागार्जुन यांची पहिली ओळख सिनेमांमुळे झाली. त्यानंतर भेटी वाढत गेल्या आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. तेव्हा दोघांना अनेक कार्यक्रमांमध्ये देखील एकत्र स्पॉट करण्यात आलं. शिवाय त्यांचे खास क्षण देखील कायम चर्चेत राहिले.
देघांच्या नात्याची चर्चा फक्त बॉलिवूडमध्येच नाहीतर, चाहत्यांमध्ये देखील रंगू लागली होती. पण तब्बू – नागार्जुन यांनी कधीच नात्याची अधिकृत घोषणा केली नाही. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे नागार्जुन विवाहित होते. नागार्जुन विवाहित असताना आणि 12 वर्ष मोठे असताना देखील तब्बू त्यांच्या प्रेमात पडली. अशात अभिनेत्रीच्या वाट्याला फक्त दुःख आलं असं देखील सांगितलं जातं.
सुरुवातीला नागार्जुन आपल्यासोबत लग्न करेल असं अभिनेत्रीला वाटलं. पण वर्ष सरत गेले आणि अभिनेत्रीची निराशा झाली. 10 वर्ष तब्बू हिच्यासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर नागार्जुन यांनी पत्नीला घटस्फोट दिला नाही. त्यामुळे तब्बू हिने नातं संपवण्याचा निर्णय घेतला.
सांगायचं झालं तर, तब्बू – नागार्जुन यांनी कधीच नात्याचा अधिकृतरित्या स्वीकार केला नाही. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत आणि कायम राहू… असं दोघेही मुलाखतीत म्हणाले होते. नुकताच फादर्स डेच्या निमित्ताने नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य याने वडिलांसोबत एक फोटो पोस्ट केला होता.
नागा चैतन्य – नागार्जुन यांचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. ज्यावर अभिनेत्री तब्बू हिने देखील प्रतिक्रिया दिली. आता तब्बू – नागार्जुन दोघे चांगले मित्र आहेत.. असं देखील सांगितलं जातं.