लेकीच्या वयाच्या मुलीसोबत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने थाटला चौथा संसार, 70 व्या वर्षी केलं चौथं लग्न

Love Life : 1969 पासून ते 2016 पर्यंत 'हा' प्रसिद्ध अभिनेता अडकला चार वेळा विवाहबंधनात... चौथी पत्नी लेकीपेक्षा देखील लहान... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा... जाणून तुम्ही देखील व्हायल हैराण...

लेकीच्या वयाच्या मुलीसोबत 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने थाटला चौथा संसार, 70 व्या वर्षी केलं चौथं लग्न
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 12:54 PM

मुंबई | 16 जानेवारी 2024 : बॉलिवूड विश्वातील असा अभिनेता ज्याने खलनायक म्हणून चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. 70-80 च्या दशकात सर्वत्र फक्त आणि फक्त सर्वूत्र अभिनेत्याच्या लूकची आणि अभिनयाची चर्चा असायची… फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्याचा बोलबाला होता… उंच, धिप्पाट, दमदार पर्सनालिटी, आवाजात वेगळाच रुबाब… इत्यादी गोष्टीमुळे अभिनेत्याने अनेकांच्या मनात घर केलं… सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगत आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेते कबीर बेदी आहे. आज कबीर बेदी यांचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.

कबीर बेदी यांच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील कबीर बेदी यांनी अनेक शोमध्ये काम केलं आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडमध्ये देखील कबीर बेदी यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं… पण कबीर बेदी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिले. 1969 पासून ते 2016 पर्यंत बेदी यांनी चार वेळा संसार थाटला…

कबीर बेदी यांचं खरं आयुष्य अगदी पडद्यावरील सेलिब्रिटींच्या आयुष्याप्रमाणे झालं होतं. कबीर बेदी यांचं कोणतंच लग्न अधिक काळ टिकलं नाही. त्यांच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री अनेकदा झाली पण कोणतंच नातं अधिक काळ टिकलं नाही… कबीर बेदी यांनी चारवेळा लग्न केलं..

हे सुद्धा वाचा

कबीर बेदी यांचे पहिलं लग्न 1969 मध्ये प्रोतिमा बेदी यांच्यासोबत झालं. पण बेदी यांचं पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही. 5 वर्षांनी 1974 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर अभिनेत्याने परदेशी फॅशन डिझायनरशी लग्न केलं पण दुर्दैवाने हे नातेही काही दिवसांनी तुटलं.

1992 मध्ये, पुन्हा एकदा कबीर बेदी यांच्या आयुष्यात निक रिडेस नावाच्या महिलेची एन्ट्री झाली. निक रिडेस आणि कबीर बेदी यांनी 2005 मध्ये लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही… तिसरं लग्न अपयशी ठरल्यानंतर कबीर बेदी यांनी 2016 मध्ये स्वतःपेक्षा 29 वर्ष लहान परवीन दोसांझसोबत लग्न केलं. आज चौथ्या पत्नीसोबत कबीर बेदी आनंदाने संसार करत आहेत.

सांगायचं झालं तर, कबीर बेदी – प्रोतिमा बेदी यांची मुलगी पूजा बेदी आणि कबीर बेदी यांची चौथी पत्नी परवीन दोसांझ यांच्या वयात फार फरक नाही. कबीर बेदी यांच्या मुलीचं वय 53 वर्ष तर कबीर बेदी यांची चौथी पत्नी परवीन दोसांझ हिचं वय 48 वर्ष आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.