Love Life: 4 महिन्यात तिसरं लग्न मोडलं, अभिनेत्री आता चौथ्या लग्नासाठी सज्ज, आहे 3 मुलांची आई

Love Life: 3 मुलांची आई आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, तीन लग्न अपयशी ठरल्यानंतर चौथ्या लग्नाच्या तयारीत, अभिनेत्रीच्या चौथ्या नवऱ्याची सर्वत्र चर्चा..., अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याच्या चर्चांना सर्वत्र उधाण...

Love Life: 4 महिन्यात तिसरं लग्न मोडलं, अभिनेत्री आता चौथ्या लग्नासाठी सज्ज, आहे 3 मुलांची आई
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 3:44 PM

Love Life: झगमगत्या विश्वात अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी दोन पेक्षा अधिक लग्न केली आहे. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या चौथ्या लग्नाची चर्चा रंगली आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, त्या अभिनेत्रीचे तीन लग्न अपयशी ठरले आहेत. शिवाय अभिनेत्री तीन मुलांची आई देखील आहे. आता अभिनेत्री चौथ्या लग्नाच्या तयारीत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. सध्या ज्या अभिनेत्रीच्या चौथ्या लग्नाची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तमिळ अभिनेत्री वनिता विजयकुमार आहे.

वनिता हिने कोरियोग्राफर रॉबर्ट याच्यासोबत चौथ्या लग्नाची घोषणा केली आहे. वनिता आणि रॉबर्ट यांच्या लग्नाची तारिख देखील समोर आली आहे. येत्या 5 ऑक्टोबर रोजी वनिता आणि रॉबर्ट लग्न करणार आहेत. वनिता हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर रॉबर्ट याला प्रपोज करताना एका फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री गुडघ्यांवर बसून रॉबर्टला प्रपोज करताना दिसत आहे.

वनिता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री दिग्गज तामिळ अभिनेते विजय कुमार यांची दुसरी पत्नी मंजुला यांची मुलगी आहे. वनिता हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. वनिता कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

वनिता हिचं पहिलं लग्न 2000 मध्ये अभिनेता आकाश याच्यासोबत झालं होतं. वनिता आणि आकाश यांना दोन मुलं देखील आहे. दोन मुलांच्या जन्मानंतर 2005 मध्ये वनिता आणि आकाश यांनी घटस्फोटाची घोषणा केली. पहिल्या घटस्फोटानंतर अभिनेत्रीने दुसरं लग्न 2007 मध्ये केलं.

वनिता हिने दुसरं लग्न उद्योजक आनंद जय राजन याच्यासोबत केलं. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण अभिनेत्रीचं दुसरं लग्न देखील टिकलं नाही. 2012 मध्ये वनिता आणि आनंद जय राजन यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

दुसऱ्या घटस्फोटानंतर वनिता हिने 2020 मध्ये तिसरं लग्न केलं. वनिता हिने दोन मुलांचा बाप असलेल्या पीटर पॉल याच्यासोबत लग्न केलं. पण अभिनेत्रीचं तिसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. लग्नच्या 4 महिन्यांनंतर वनिता आणि पीटर यांचे मार्ग वेगळे झाले. आता अभिनेत्री वनिता चौथ्या लग्नाच्या तयारीत आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.