हृतिक रोशन सारखा हुबेहूब दिसणारा तरुण, ज्यूसच्या दुकानात करतो काम, त्याला पाहून व्हाल अवाक्
Hrithik Roshan: तेच डोळे, तोच चेहरा... हुबेहूब हृतिक रोशन सारख्या दिसणाऱ्या तरुणाला पाहून व्हाल अवाक्... ज्यूसच्या दुकानात करतो काम... व्हिडीओ तुफान व्हायरल... गेल्या काही दिवसांपासून तरुणाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल...
सोशल मीडिया असं एक प्लॅटफॉर्म आहे, जेथे अनेक गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळतात. सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चा रंगलेली असते ती म्हणजे सेलिब्रिटींची… सेलिब्रिटींची स्टाईल, त्यांचं रॉयल आयुष्य, त्यांचे अफेअर्स… अनेक गोष्टी चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींसारखे हुबेहूब दिसणारे चेहरे देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोणीच ओळखत नसणारे चेहरे देखील सोशल मीडियामुळे सध्याच्या घडीला प्रसिद्धी झोतात आहेत. आता देखील सोशल मीडियावर एका तरुणाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये दिसणारा तरुण हुबेहूब अभिनेता हृतिक रोशन याच्यासारखा दिसत आहे.
तरुणाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील थोड्यावेळासाठी धक्का बसेल. कारण व्हिडीओत दिसणारा मुलगा हुबेहूब हृतिक रोशन याच्यासारखा दिसत आहे. सोशल मीडियावर तरुणाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. नेटकरी देखील तरुणाचं कौतुक करत असतात.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, हृतिक रोशन याच्यासारखा दिसणार तरुण तासगाव येथील राहणारा आहे. तरुण एका ज्यूस सेंटरमध्ये काम करते. त्याला पाहिल्यानंतर प्रत्येक जण सेल्फी घेण्यासाठी उत्सुक असतो. कारण तरुणाचा चेहरा आणि त्याचे डोळे हुबेहूब अभिनेता हृतिक रोशल याच्यासारखा दिसत आहे. तरुणाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.
View this post on Instagram
व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘हृतिक रोशल याच्याकडून ज्यूस प्यायला कोणाला आवडणार नाही…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘एक दिवस हृतिकच येईल तुझ्याकडे…’, तिसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘कोरियन ग्लास ट्रीटमेंट करून घे भावा…’ सध्या सर्वत्र हृतिक सारख्या दिसणाऱ्या तरुणाची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, अभिनेता हृतिक रोशन याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. हृतिकने अनेक सिनेमांंमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आणि डान्सने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणाला भेटण्यासाठी देखील अनेक चाहते येत असतात.