अभिनेत्रीचं पहिलं हिंदू नंतर मुस्लीम पुरुषाशी लग्न, दोनदा घटस्फोट, आजारपणातही नवरा करयाचा शारीरिक छळ
Actress Love Life: 'माझ्या जीवाची त्याला पर्वा नव्हती, त्याला फक्त शारीरिक संबंध...', पहिलं लग्न हिंदू पुरुषाशी तर, दुसरं लग्न मुस्लीम पुरुषाशी... दोन घटस्फोटानंतर अभिनेत्री एकटीच करतेय 2 मुलांचा सांभाळ... आता करणार तिसरं लग्न? चर्चांना उधाण
झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, तिने पहिलं लग्न हिंदू पुरुषासोबत केलं, तर दुसरं लग्न मुस्लीम पुरुषासोबत… पण दोन्ही नात्यात अभिनेत्रीच्या आयुष्यात फक्त आणि फक्त निराशाच आली. आता अभिनेत्री तिसरं लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोन घटस्फोटानंतर अभिनेत्री एकटीच दोन मुलांचा सांभाळ करत आहे. अभिनेत्री खासगी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना आहे. चाहत हिने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी करियरला सुरुवात केली. 2002 मध्ये कॅडबरीच्या जाहिरातीत अभिनेत्रीने काम केलं होतं. त्यानंतर चाहत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दिसली. अखेर 2005 मध्ये अभिनेत्री प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत वाढ झाली. 2005 मध्ये अभिनेत्रीला ‘हीरो – भक्ती ही शक्ती’ मध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
View this post on Instagram
प्रसिद्धी मिळाल्यानंतर चाहते हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर चाहत हिने ‘कुमकुम-एक प्यारा सा बंधन’ मालिकेत सुमित आणि कुमकुम यांची लेक अश्का या भूमिकेला न्याय दिला. ज्यानंतर अभिनेत्रीला अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
जिसमें ‘काजल’, ‘बड़े अच्छे लगते हैं’, ‘कुबूल है’ आणि ‘डर सबको लगता है’ यांसारख्या मालिकांमध्ये अभिनेत्री झळकली. अनेक सिनेमांमध्ये देखील चाहत हिने काम केलं आहे. में ‘7½ फेरे’, ‘एक मैं एक तुम’, ‘थैंक्यू’, ‘प्रस्थानम’ आणि ‘यात्रीज’ सिनेमांमध्ये अभिनेत्रीने काम केलं.
अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये अभिनेत्रीने काम केलं. पण अभिनेत्रीची लोकप्रियता फार काळ टिकली नाही. चाहत तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली. चाहत हिने वयाच्या 20 व्या वर्षी भरत नरसिंघानी याच्यासोबत लग्न केलं. पण अभिनेत्रीचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर अभिनेत्रीने पहिल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या घटस्फोटानंतर चाहत हिने 2013 मध्ये फरहान मिर्झा याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. फारहान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीने दुसऱ्या पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले. ज्यामुळे अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चव्हाट्यावर आलं.
चाहत दुसऱ्या नवऱ्यावर गंभीर आरोप करत म्हणाली, ‘फरहान मला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा… प्रकृती ठिक नसताना देखील तो शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्याला माझ्या जीवाची काहीही पर्वा नव्हती.’ सांगायचं झालं तर, दुसऱ्या घटस्फोटानंतर अभिनेत्री दोन मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.