कंगनाच्या ‘एमर्जन्सी’मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार संजय गांधींची भूमिका

संजय गांधी यांच्या भूमिकेसाठी गेल्या सहा महिन्यांपासून कलाकाराचा शोध सुरू होता. विशाकचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असून त्याला अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका मिळाली आहे.

कंगनाच्या 'एमर्जन्सी'मध्ये 'हा' अभिनेता साकारणार संजय गांधींची भूमिका
Kangana RanautImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 1:26 PM

बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) ‘एमर्जन्सी’ (Emergency) या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. या चित्रपटातील एकेका भूमिकेवरून पडदा उचलण्यात येतोय. याआधी इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, सॅम माणेकशॉ, पुपुल जयकार यांच्या भूमिका कोण साकारणार हे जाहीर झालं होतं. आता चित्रपटात संजय गांधी (Sanjay Gandhi) यांची भूमिका कोण साकारणार हे समोर आलं आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी संजय गांधी यांच्या भूमिकेचा नवीन पोस्टर लाँच केला आहे.

एमर्जन्सी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन कंगनाच करत आहे. याचसोबत ती चित्रपटात दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका सुद्धा साकारत आहे. एमर्जन्सीमध्ये संजय गांधी यांची भूमिका अभिनेता विशाक नायर साकारणार आहे. विशाकने याआधी काही मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलंय. आनंदम, पुथन पानम, चंक्ज यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

एमर्जन्सी या चित्रपटात कंगनासोबत अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण यांच्याही भूमिका आहेत. “संजय हे श्रीमती गांधींच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक आहेत. यासाठी मला अशा एका व्यक्तीची गरज होती, ज्यामध्ये निरागसता अबाधित राहील आणि त्याच वेळी ती हुशारही दिसेल. त्या व्यक्तीला विविध छटा असणे आवश्यक होतं,” असं कंगनाने संजय गांधींच्या भूमिकेबद्दल सांगितलं.

संजय गांधी यांच्या भूमिकेसाठी गेल्या सहा महिन्यांपासून कलाकाराचा शोध सुरू होता. विशाकचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असून त्याला अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका मिळाली आहे. तो या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेल, असा विश्वास कंगनाने व्यक्त केला. इंदिरा गांधींनी 1975 ते 1977 या 21 महिन्यांच्या कालावधीसाठी आणीबाणी लागू केली होती. त्यावेळी लोकांच्या मूलभूत अधिकारांवर कठोर अंकुश ठेवण्यात आला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.