मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री पूनम पांडे हिच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. हेच नाही तर पूनम पांडे हिच्या निधनाची बातमी ऐकून तिचे जवळचे मित्र-मैत्रिण देखील हैराण झाले. गुरुवारी रात्री पूनम पांडे हिचे निधन झाले. ‘नशा’ या चित्रपटातून पूनम पांडे हिने धमाकेदार पद्धतीने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. मोठा काळ तिने नक्कीच बाॅलिवूडमध्ये गाजवला. पूनम पांडे हिचे खासगी आयुष्य देखील वादग्रस्त राहिले. पती सतत पूनम पांडे हिला मारहाण करत असत. हेच नाही तर थेट पोलिसांमध्ये तिने पती विरोधात तक्रार देखील दाखल केली.
आता पूनम पांडे हिच्या अशाप्रकारे अचानक जाण्याने तिची जवळची मैत्रिण संभावना सेठ हिला देखील मोठा धक्का बसलाय. नुकताच संभावना सेठ म्हणाली की, पूनम किती जास्त त्रास सहन करत होती. मात्र, ती कधीच याबद्दल बोलली नाही. अगदी लहानच होती. खूप झाले तर तिचे वय हे 30 ते 32 असेल. पूनमच्या निधनाचे ऐकल्यावर मला धक्काच बसला.
मी आणि पूनम खतरो के खिलाडीमध्ये एकसोबत होतो. तसेच आम्ही अनेक ठिकाणी एकत्र नेहमीच भेटत होता. मात्र, ती तिच्या आयुष्यात इतके काही सहन करत आहे. याबद्दल माहिती नव्हते. मी बाहेर असल्यामुळे मी तिला शेवटचे भेटण्यासाठी येऊ शकत नाही. पण मला तिच्या अत्यंदर्शनासाठी उपस्थित राहायची इच्छा आहे.
पूनमने तिच्या आयुष्यात अगदी लहान वयात बऱ्याच काही गोष्टी नक्कीच सहन केल्या. पुढे संभावना सेठ म्हणाली की, पूनम खूप जास्त सकारात्मक मुलगी होती. ती नेहमीच सकारात्मक विचारत करत. पुनमने कधीच तिच्या आरोग्याबद्दल जाहिरपणे काहीच भाष्य हे केले नाही. पूनम पांडे ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे.
मुंबईच्या अत्यंत महागड्या परिसरात पूनम पांडे हिचे आलिशान असे अपार्टमेंट आहे. आलिशान गाड्यांचे देखील मोठे कलेक्शन हे पूनम पांडे हिच्याकडे आहे. अभिनय, मॉडेलिंग आणि जाहिरातीमधून पूनम पांडे हिने कोट्यवधीची संपत्ती जमा केली. पूनम पांडे ही सोशल मीडियावर कायमच बोल्ड फोटो शेअर करताना दिसली.