‘मी प्रेग्नंट आहे’ असं सांगताच कुटुंबीयांनी अभिनेत्रीचं 72 तासांत लावलं लग्न; कोण आहे ही?
अभिनेत्याला चार वर्षे डेट केल्यानंतर या प्रसिद्ध अभिनेत्रीने अवघ्या 72 तासांत लग्न उरकलं. लग्नाआधीच गरोदर असल्याचं कुटुंबीयांना सांगितल्यावर त्यांनी तिच्यासमोर एक अट ठेवली. या अटीमुळे दोघांनाही तडकाफडकी लग्न उरकावं लागलं होतं.
बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांनी तडकाफडकी लग्न करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. अशीच एक जोडी फिल्म इंडस्ट्रीत तुफान चर्चेत होती. कारण लग्नाआधीच गरोदर राहिल्याने अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी तिला लगेच लग्न करण्यास भाग पाडलं होतं. कुटुंबीयांना प्रेग्नंट असल्याचं सांगताच त्याच्या 72 तासांमध्ये तिचं लग्न उरकलं होतं. आज त्याच अभिनेत्रीचा 44 वा वाढदिवस आहे. 27 ऑगस्ट 1980 रोजी केरळमधल्या कोची याठिकाणी या अभिनेत्रीचा जन्म झाला. आज ती दोन मुलांची आई असून अभिनेता असलेल्या पतीसोबत सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. या दोघांच्या लग्नाचा किस्सा फारच रंजक आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून नेहा धुपिया आहे.
10 मे 2018 रोजी नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी गुरुद्वारामध्ये लग्न केलं होतं. लग्नाआधीच गरोदर असल्याने नेहाचं लग्न तडकाफडकी उरकण्यात आलं होतं. ‘टाइम्स नाऊ डिजिटल’ला दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द नेहाने याबाबतीत खुलासा केला होता. नेहाने सांगितलं होतं की जेव्हा तिने गरोदर असल्याचं कुटुंबीयांना सांगितलं तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी तिच्यासमोर एक अट ठेवली होती. नेहा म्हणाली, “मी माझ्या आईवडिलांना अंगद आणि माझ्या नात्याविषयी सांगितलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्यानंतर मी सांगितलं की, मी गरोदर आहे. तेव्हा त्यांनी मला फक्त दोन दिवसांचा वेळ दिला आणि सांगितलं की लग्न करून टाका. अंगदला मी लग्नाआधी चार वर्षांपासून ओळखायची. त्यामुळे इतक्या लवकर लग्नाचा निर्णय घेणं माझ्यासाठी फार कठीण नव्हतं.”
View this post on Instagram
अवघ्या 72 तासांमध्ये आम्ही लग्न उरकलं होतं, असं नेहाने पुढे सांगितलं. लग्नाच्या जवळपास पाच महिन्यांनंतर तिने नोव्हेंबर 2018 मध्ये मुलीला जन्म दिला. नेहा आणि अंगदने त्यांच्या मुलीचं नाव मेहेर असं ठेवलंय. त्यानंतर 3 ऑक्टोबर 2021 रोजी नेहाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्याचं नाव गुरिक सिंह बेदी असं ठेवलंय.
नेहाने 2003 मध्ये ‘कयामत’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘जुली’, ‘शिखर’, ‘चुप चुप के’, ‘शीशा’, ‘फंस गए रे ओबामा’, ‘दे दना दन’, ‘रंगीले’, ‘बॅड न्यूज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. नेहा आता चित्रपटांमध्ये फार क्वचित दिसून येते. पण सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते. त्याचप्रमाणे तिचा पॉडकास्टसुद्धा बराच चर्चेत असतो. या पॉडकास्टमध्ये ती विविध सेलिब्रिटींच्या मुलाखती घेते.