Ind vs Ban : भारताला हरवलं तर बांगलादेशी क्रिकेटरसोबत डिनर डेटवर जाईन; अभिनेत्रीचं ट्विट चर्चेत

भारत आणि बांगलादेश या प्रतिस्पर्ध्यांबद्दल बोलायचं झाल्यास, भारताला या सामन्यातून वेगळं असं काहीच साध्य करायचं नाही. तर दुसरीकडे बांगलादेश संघाला खूप काही सिद्ध करायचं आहे. स्पर्धेतील आव्हान टिकविण्यासाठी त्यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

Ind vs Ban : भारताला हरवलं तर बांगलादेशी क्रिकेटरसोबत डिनर डेटवर जाईन; अभिनेत्रीचं ट्विट चर्चेत
Ind vs BanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 9:23 AM

मुंबई : 19 ऑक्टोबर 2023 : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये आज भारताचा मुकाबला बांगलादेशशी आहे. या सामन्याविषयी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह आहे. यादरम्यान एका अभिनेत्रीचं ट्विट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या अभिनेत्रीने थेट असं जाहीर केलं आहे की जर बांगलादेशच्या टीमने आजचा भारतविरोधातील सामना जिंकला तर ती स्वत: ढाका जाईल आणि बांगलादेशी क्रिकेटर्ससोबत डिनर करेल. अभिनेत्रीच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा आहे. या ट्विटवरून अनेकांनी तिला ट्रोलसुद्धा केलं आहे. भारताच्या पराजयाची कामना करणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण, हे जाणून घेण्याचा प्रयत्न नेटकरी करत आहेत.

कोण आहे ही अभिनेत्री?

बांगलादेशच्या क्रिकेटर्ससोबत डिनर डेटवर जाण्याबद्दल ट्विट करणारी ही अभिनेत्री पाकिस्तानी आहे. सहर शिनवारी असं तिचं नाव आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास 25 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सहरचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. कोहट परिसरातील शिनवारी समुदायाच्या सहरने 2014 मध्ये ‘शेर सव्वाशेर’ या कॉमेडी मालिकेतून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 2015 मध्ये तिने कराचीमधील एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं.

हे सुद्धा वाचा

वादग्रस्त ट्विट्समुळे चर्चेत

सहर अशा पद्धतीच्या ट्विटमुळे चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी 2022 मध्ये टी-20 वर्ल्ड कपदरम्यान सहरने केलेलं ट्विट चर्चेत आलं होतं. जर झिम्बाब्वेच्या टीमने भारताला हरवलं तर मी झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेन, असंच तिने थेट म्हटलं होतं. सहरने श्रीलंका आणि भारत यांच्या मॅचदरम्यानही एक ट्विट केलं होतं. इतकंच नव्हे तर गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वीही तिने भाजपच्या पराभवाविषयी ट्विट केलं होतं. ‘गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल. असं न झाल्यास मला जे काही म्हणायचं असेल ते म्हणा’, असं तिने लिहिलं होतं. मात्र जेव्हा भाजपने ही निवडणूक जिंकली, तेव्हा तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. वर्ल्ड कपच्या या प्रवासात आतापर्यंत टीम इंडियाने सलग तीन वेळा विजय मिळवला आहे. आता चौथ्या सामन्यात बांगलादेशाला सामोरं जाताना टीम इंडियाचे सगळे प्रयत्न हे विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी अग्रस्थान पुन्हा मिळवण्याचे असतील.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.