Stardom | शाहरुख खान याच्या लेकाच्या वेब सीरिजमध्ये फक्त रणवीर कपूरच नाही तर बाॅलिवूडचा ‘हा’ अभिनेता करणार धमाका, आर्यन याच्या…

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपुर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाका केला. आता शाहरुख खान याचा लेक आर्यन खान देखील धमाका करताना दिसणार आहे.

Stardom | शाहरुख खान याच्या लेकाच्या वेब सीरिजमध्ये फक्त रणवीर कपूरच नाही तर बाॅलिवूडचा 'हा' अभिनेता करणार धमाका, आर्यन याच्या...
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 8:11 PM

मुंबई : शाहरुख खान याचा लेक आर्यन खान (Aryan Khan) हा कायमच चर्चेत असतो. विशेष म्हणजे आता आर्यन खान बाॅलिवूडमध्ये लवकरच पर्दापण करणार आहे. आर्यन खान हा अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार नसून तो डायरेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा देखील आर्यन खान याच्यावर प्रचंड खुश असल्याचे सांगितले जात आहे. आर्यन खान याची वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आर्यन खान याच्या वेब सीरिजच्या प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. आता याबद्दल मोठे अपडेट (Update) पुढे आले आहे.

आर्यन खान याच्या वेब सीरिजचे नाव स्टारडम आहे. विशेष म्हणजे स्टारडमच्या शूटिंगला देखील सुरूवात करण्यात आलीये. वरळीमध्ये वेब सीरिजचे शूटिंग सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच सांगण्यात आलेल्या रिपोर्टनुसार या वेब सीरिजमध्ये रणबीर कपूर हा धमाका करताना दिसणार आहे.

फक्त रणबीर कपूर हाच नाही तर करण जोहर याच्या कॅमिओचा देखील जबरदस्त तडका वेब सीरिजमध्ये बघायला मिळणार आहे. या वेब सीरिजचे काम जोरदार सुरू आहे. काही दिवसांपुर्वीच आलेल्या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले होते की, शाहरुख खान याची झलक देखील लेकाच्या वेब सीरिजमध्ये बघायला मिळणार आहे.

परंतू यावर अजून काहीच खुलासा होऊ शकला नाही. नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार आता बाॅलिवूडचा स्टार रणवीर सिंह हा देखील आर्यन खान याच्या स्टारडम वेब सीरिजमध्ये धमाका करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे असे सांगितले जात आहे की, स्टारडममध्ये रणवीर सिंह हा महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.

आता चाहते हे आर्यन खान याच्या स्टारडम वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच आर्यन खान आणि शाहरुख खान हे एका जाहिरातीमध्ये एकसोबत काम करताना दिसले होते. यांची जोडी प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडली होती. आर्यन खान हा त्याच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

फक्त शाहरुख खान याचा लेक आर्यन खान हाच नाही तर शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही देखील लवकरच बाॅलिवूडमध्ये पर्दापण करण्यास तयार आहे. सुहाना खान हिच्या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाले आहे. या चित्रपटात खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील धमाका करताना दिसणार आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.