एकाच आठवड्यात या स्पर्धकाला ‘बिग बॉस 17’च्या घरातून थेट बाहेरचा रस्ता, चाहतेही हैराण

बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. बिग बॉस 17 चा नुकताच विकेंडचा वार हा पार पडलाय. यावेळी सलमान खान याने घरातील अनेक सदस्यांचा क्लास लावला. विशेष म्हणजे या विकेंडच्या वारला मोठे खुलासे देखील करण्यात आले.

एकाच आठवड्यात या स्पर्धकाला 'बिग बॉस 17'च्या घरातून थेट बाहेरचा रस्ता, चाहतेही हैराण
Follow us
| Updated on: Nov 05, 2023 | 2:17 PM

मुंबई : बिग बॉस 17 चांगलाच धमाका करताना दिसत आहे. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. आता बिग बॉस 17 चा विकेंडचा वार हा पार पडलाय. इतकेच नाही तर थेट सलमान खान याने मोठे खुलासे केले. विकी जैन आणि नील भट यांचा क्लास लावताना सलमान खान हा दिसला. शोमध्ये सहभागी होण्याच्या अगोदर कशाप्रकारे यांनी एकमेकांशी संपर्क केला, ते बिग बॉसच्या नियमांच्या विरोधात आहे, याबद्दल सलमान खान हा बोलला.

नुकताच या आठवड्याचे नाॅमिनेशन हे पार पडलंय. बिग बॉस 17 च्या या आठवड्यात सना खान, विकी जैन, समर्थ जुरेल, मनस्वी ममगई, अरूण माशेट्टी आणि ईशा मालवीय हे नाॅमिनेट होते. यापैकी सना खान ही बिग बॉस 17 मधून बाहेर पडणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. मात्र, प्रत्यक्षात सर्वकाही उलटे झाल्याचे बघायला मिळाले.

सना खान ही नाही तर मनस्वी ममगई ही बिग बॉस 17 मधून बाहेर पडलीये. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे दिसतंय. बिग बॉस 17 मध्ये मनस्वी ही वाइल्ड कार्ड म्हणून दाखल झाली. मात्र, थेट एकाच आठवड्यात ती बिग बॉस 17 च्या घराबाहेर पडली. यामुळे मनस्वी हिच्या चाहत्यांना मोठा धक्का हा नक्कीच बसलाय.

बिग बॉस 17 मध्ये मोठा हंगामा होताना दिसत आहे. मनस्वी ममगई ही बिग बाॅस 17 मधून बाहेर पडणार असल्याचे जाहिर होताच अभिषेक कुमार आणि अरूण माशेट्टी यांच्यामध्ये मोठा वाद होताना दिसतोय. विशेष म्हणजे यांचा वाद इतका जास्त टोकाला जातो की, ते मनस्वी हिला सोडण्यासाठी देखील येत नाहीत आणि भांडणे करत बसतात.

यावेळी विकेंडच्या वारमध्ये सलमान खान याने घरातील जवळपास सर्वच सदस्यांचा क्लास लावला. ईशा, अभिषेक आणि समर्थ हे सलमान खान याच्या निशाण्यावर आहेत. मात्र, अजूनही बिग बॉस 17 मध्ये नेमके काय सुरू आहे, हे चाहत्यांना कळत नाहीये. निर्माते अजून काही बदल शोमध्ये नक्कीच करू शकतात. हे सीजन धमाका करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.