नावेदनंतर थेट ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला ‘बिग बॉस 17’मधून बाहेरचा रस्ता, चाहते हैराण
बिग बॉस 17 मध्ये मोठे हंगामे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये एक क्रेझ नक्कीच बघायला मिळतंय. मात्र, बिग बॉस 17 ला अजूनही टीआरपीमध्ये म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळाले नाहीये. म्हणूनच पुढील काही दिवसांमध्ये घरात मोठे बदल हे होताना दिसणार आहेत. मोठे हंगामे होऊ शकतात.
मुंबई : बिग बॉस 17 मध्ये मोठे धमाके होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 मधून नावेद हा बाहेर पडलाय. अजून एक स्पर्धक घराबाहेर पडणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, हा मोठा झटका सर्वांसाठीच असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर घरातील सदस्य हे ढसाढसा रडताना दिसत आहेत. रिपोर्टनुसार बिग बॉस 17 मधून चक्क नील भट्ट हा बाहेर पडणार असल्याचे सांगितले गेले आहे. हा सर्वात मोठा धक्का असणार आहे. बिग बॉस 17 मध्ये नील भट्ट हा पत्नी ऐश्वर्या शर्मा हिच्यासोबत सहभागी झालाय. मात्र, नील भट्ट हा घरात धमाकेदार गेम खेळताना दिसला नाहीये.
नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार नावेदनंतर थेट नील भट्ट हा बेघर होणार आहे. नील भट्ट हा बेघर होणार असल्याचे कळताच ऐश्वर्या शर्मा ही ढसाढसा रडताना दिसली. मात्र, यामुळे घरातील सदस्यांसोबतच चाहते देखील हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. नील भट्ट हा बिग बॉस 17 मध्ये फार जास्त दिसत नव्हता. तो आणि ऐश्वर्या एकसोबत सतत दिसत होते.
बिग बॉस 17 च्या घरात ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांच्यामध्ये मोठा वाद होताना दिसला. इतकेच नाही तर यांच्यामध्ये मोठी भांडणे देखील झाली आहेत. एका भांडणामध्ये ऐश्वर्या शर्मा ही थेट नील भट्ट याला चल निघ…निघ तू…असे म्हणताना दिसली. ज्यानंतर अनेकांनी ऐश्वर्या शर्मा हिला खडेबोल सुनावण्यास सुरूवात केली.
इतकेच नाही तर थेट सलमान खान याने देखील ऐश्वर्या शर्मा हिचा क्लास विकेंडच्या वारमध्ये लावला. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत तर ऐश्वर्या शर्मा ही पती नील भट्ट याच्यासोबत दाखल झालीये. मात्र, आता नील हा बिग बॉस 17 मधून बाहेर पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा प्रोमो शोच्या आगामी भागाचा असून या व्हिडीओमध्ये बिग बॉस 17 च्या निर्मात्यांकडून घरातील सदस्यांसाठी खास टास्क दिसल्याचे दिसत आहे. मात्र, मनारा चोप्रा हिच्यामुळे टास्कमध्ये मोठा हंगामा होताना दिसतोय. पुढील काही दिवसांमध्ये बिग बॉस 17 मध्ये मोठे हंगामे होऊ शकतात.