थाटत लग्न करून माजी खासदाराने पहिलं लग्न ठरवलं बेकायदेशीर, आई झाल्यानंतर ‘ती’ बॉयफ्रेंडबद्दल म्हणाली…
'या' माजी महिला खासदाराने परदेशात उद्योजकासोबत केलं थाटात लग्न, पण काही महिन्यांनंतर लग्न ठरवलं अवैध... आई झाल्यानंतर 'ती' बॉयफ्रेंडबद्दल म्हणाली..., सोशल मीडियावर कायम असते सक्रिय...
पहिलं लग्न अवैध ठरवल्यानंतर महिला खासदाराच्या रिलेशनशिपची चर्चा एका अभिनेत्यासोबत रंगू लागली. दरम्यान खासदार महिलेने मुलाला जन्म दिला… मुलाच्या जन्मानंतर तिने अनेक बॉयफ्रेंडसोबत अनेक फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले. सध्या ज्या माजी महिला खासदाराची चर्चा रंगली आहे, ती एक अभिनेत्री देखील आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून नुसरत जहाँ आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी नुसरत हिने अनेक बंगाली सिनेमांमध्ये काम केलं आहे.
प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच लोकप्रिय असलेल्या नुसरत जहाँने 2019 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर पश्चिम बंगालच्या बसीरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवली तेव्हा ती प्रचंड मतांनी जिंकली. जेव्हा अभिनेत्री शपथविधी सोहळ्यासाठी जायचं होतं, तेव्हा नुसरत तुर्की याठिकाणी निखिल जैन यांच्यासोबत होती. तुर्कीमध्येच देघांनी मोठ्या थाटात लग्न देखील केलं.
लग्नानंतर नुसरत जहाँ हिंदू महिलेप्रमाणेच संसदेत पोहोचली तेव्हा तिला सोशल मीडियावर लोकांच्या टीकेला सामोरे जावं लागलं. त्यानंतर माजी खासदाराने जात-धर्माच्या बंधनांच्यावर असल्याचं सांगत रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला. 19 जून 2019 मध्ये निखील आणि नुसरत यांनी लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही.
विवाहित असताना, नुसरत हिच्या रिलेशनशिपच्या चर्चा अभिनेता यशदास गुप्ता याच्यासोबत रंगू लागल्या. अशात नुसरत हिने निखील याच्यासोबत याच्यासोबत झालेलं लग्न बेकायदेशीर असल्याचं घोषित केलं. नुसरत म्हणाली, ‘आमचं लग्न तुर्की याठिकाणी झालं आहे. ज्यामुळे भारतीय कायद्यानुसार आमचं लग्न बेकायदेशीर आहे…’ अशात नुसरत हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगू लागली.
नुसरत हिने 26 ऑगस्ट 2021 मध्ये मुलगा ईशान याला जन्म दिला. दरम्यान, यशदास गुप्ता याच्यासोबत अभिनेत्रीच्या रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये तथ्य असल्याचं समोर आलं. एवढंच नाही तर, मुलाच्या जन्म दाखल्यावर देखील देबाशीष दासगु्प्ता असं नाव आहे. जे यशदास गुप्ता याचं खरं नाव आहे. नुसरत फोटोंमध्ये यशच्या नावाचे कौतुक करताना दिसली आणि यश एक चांगला पिता आणि पती असल्याचं सांगितलं… पण अभिनेत्री कायम यशदास गुप्ता याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल बोलणं टाळते.
नुसरत कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील नुसरतच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.