Actor passed away | धक्कादायक! मुंबईत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मृतदेह सापडला बाथरूममध्ये
मुंबईत एका प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. या अभिनेत्याने अनेक टीव्ही मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.
![Actor passed away | धक्कादायक! मुंबईत 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मृतदेह सापडला बाथरूममध्ये Actor passed away | धक्कादायक! मुंबईत 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मृतदेह सापडला बाथरूममध्ये](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/23000927/actor.jpg?w=1280)
मुंबई : मनोरंजन क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक बातमी पुढे येतंय. एका टीव्ही अभिनेत्याचे निधन (Actor passed away) झाले आहे. अत्यंत कमी वयामध्ये या अभिनेत्याने एक खास ओळख मिळवली होती. विशेष म्हणजे या अभिनेत्याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. या अभिनेत्याचे नाव आदित्य सिंह राजपूत (Aditya Singh Rajput) असे असून CID मालिकेत देखील काही वर्ष महत्वाच्या भूमिकेत आदित्य सिंह राजपूत होता. अनेक जाहिरातीमध्येही आदित्य सिंह राजपूत याने काम केले आहे. सोशल मीडियावर (Social media) तगडी फॅन फाॅलोइंग ही आदित्य सिंह राजपूत याची बघायला मिळते.
आदित्य सिंह राजपूत याच्या निधनाच्या बातमीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. आदित्य सिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या घरातील बाथरूम सापडला. आदित्य सिंह राजपूत याला त्याच्या मित्रांनी दवाखान्यात नेले असताना डाॅक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले आहे. आदित्य सिंह राजपूत याच्या निधनानंतर सर्वचजण दुखात दिसत आहेत.
आदित्य सिंह राजपूत हा 32 वर्षाचा होता. आदित्य सिंह राजपूत याने आपल्या करिअरची सुरूवात ही वयाच्या 17 व्या वर्षीच केली होती. अत्यंत कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाच्या जोराने त्याने छाप सोडली होती. आदित्य सिंह राजपूत याचे निधन नेमके कशाने झाले यावर जोरदार चर्चा या रंगताना दिसत आहेत.
आदित्य सिंह राजपूत हा टीव्ही क्षेत्रातील एक प्रसिध्द चेहरा होता. मुंबईतील अंधेरी येथे तो राहत होता. अंधेरी येथील एका सोसायटीमध्ये 11 व्या मजल्यावर आदित्य सिंह राजपूत याचा फ्लॅट आहे. याच प्लॅटमधील बाथरूममध्ये आदित्य सिंह राजपूत याचा मृतदेह सापडला आहे. इमारतीचे वॉचमॅन आणि त्याच्या मित्रांनी त्याला दवाखान्यात नेले.
एका रिपोर्टनुसार आदित्य सिंह राजपूत याचे निधन हे ड्रग्समुळे झाल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या जवळच्या मित्राने याबाबत माहिती दिल्याचे रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे. आदित्य सिंह राजपूत याने आपल्या करिअरची सुरूवात ही मॉडल म्हणून केली होती. आता आदित्य सिंह राजपूत याच्या निधनाने सर्वच जण हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे.