सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, ‘या’ गँगस्टरच्या भावाने घेतली जबाबदारी, सोशल मीडियावर पोस्टवर दावा
Salman Khan Home Firing : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या सातत्याने मिळत आहेत. आता तर थेट सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आलाय.
बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान याच्या मुंबईतील घराबाहेर पहाटे गोळीबार करण्यात आल्याचे घटना घडलीये. या घटनेनंतर सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या या मिळत आहेत. विशेष म्हणजे सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबाराचा व्हिडीओही पुढे आलाय. दोन हल्लेखोर हे दुचाकीवरून आल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. एकून पाच गोळया झाडल्या गेल्याचे सांगितले जातंय.
सलमान खानच्या घराबाहेर हा गोळीबार लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने केल्याचा संशय होता. आता या गोळीबाराची जिम्मेदारी ही घेण्यात आलीये. लॉरेन्स बिश्नोईच्या भावानेच या गोळीबाराची जिम्मेदारी घेतलीये. याबद्दलची एक पोस्टही सोशल मीडियावर शेअर करण्यात आलीये. यामुळे सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय.
या पोस्टमध्ये म्हणण्यात आले की, आम्हाला शांतता हवी आहे, दडपशाहीविरोधात निर्णय युद्धातून आला तर ते योग्य आहे. सलमान खान तुला ट्रेलर दाखवण्यासाठी आम्ही हे केले आहे. जेणेकरून तुला आमची ताकद समजेल. हेच नाही तर आम्ही तुला ही शेवटची वार्निंग देतो असेही या पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे. यानंतर या गोळ्या फक्त घरावर चालणार नाहीत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही पोस्ट अनमोल बिश्नोईने शेअर केलीये. अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ असल्याचे देखील सांगितले जातंय. आता हे स्पष्ट होताना दिसत आहे की, सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराची जिम्मेदारी ही लॉरेन्स बिश्नोई टोळीनेच घेतलीये. सतत लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वीच लॉरेन्स बिश्नोई हा सलमान खान याला जीवे मारणार असल्याचे बोलताना दिसला. हेच नाही तर सलमान खान याला मेल करूनही जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत. सलमान खान याच्या घरावरील गोळीबारानंतर एक तणावाचे वातावरण हे बघायला मिळत आहे. पोलिसांकडूनही सलमान खान याला अतिरिक्त सुरक्षा ही पुरवण्यात आलीये. या प्रकरणातील तपास करण्यासाठी पोलिसांकडून वीस पथके तयार करण्यात आल्याचे देखील सांगितले जातंय.