रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरीनंतर ‘ही’ अभिनेत्री बनतेय नॅशनल क्रश; सौंदर्यावर नेटकरी फिदा!

गेल्या काही दिवसांपासून 'ॲनिमल' या चित्रपटातील अभिनेत्री तृप्ती डिमरीला 'नॅशनल क्रश' म्हटलं जात होतं. मात्र आता रश्मिका किंवा तृप्तीला नव्हे तर आणखी एका अभिनेत्रीला 'नॅशनल क्रश' हे नाव मिळालंय. या अभिनेत्रीचा चाहतावर्ग हळूहळू सोशल मीडियावर वाढतोय.

रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरीनंतर 'ही' अभिनेत्री बनतेय नॅशनल क्रश; सौंदर्यावर नेटकरी फिदा!
20 कोटी बजेटच्या चित्रपटातून सोडली छाप; नेटकऱ्यांनी दिला 'नॅशनल क्रश'चा टॅग Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 3:00 PM

मुंबई : 6 जानेवारी 2024 | अभिनेत्री रश्मिका मंदाना, प्रिया वारियर, तृप्ती डिमरी या अभिनेत्रींना नेटकऱ्यांनी ‘नॅशनल क्रश’ असा टॅग दिला. या अभिनेत्रींवर लाखो चाहते फिदा आहेत. रश्मिका आणि प्रिया हे आधीपासूनच लोकप्रिय आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ या चित्रपटामुळे तृप्ती डिमरीचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. या तिघींनंतर आता एका अशा अभिनेत्रीला ‘नॅशनल क्रश’चा टॅग मिळाला आहे, जिच्या चित्रपटाने अवघ्या 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये जगभरात 60 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या दोन महिन्यांनंतरही तिच्या चित्रपटाचा थिएटर आणि सोशल मीडियावर बोलबाला आहे. इतकंच काय तर या अभिनेत्रीचा हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन का पाहिला नाही, अशी खंत काहींनी व्यक्त केली आहे. फोटोत दिसणारी ही चिमुकली अभिनेत्री मेधा शंकर आहे. हे नाव तुम्ही आजवर सहसा ऐकलं नसणार. पण ‘बारवी फेल’ या चित्रपटाचं नाव घेतलं तर तुमच्या डोळ्यांसमोर त्या अभिनेत्रीचा चेहरा आवर्जून येईल.

अभिनेत्री मेधा शंकरने ’12th fail’ (बारवी फेल) या चित्रपटात श्रद्धा जोशीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिचे काही सीन्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेव्हापासूनच ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण, याविषयी नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 2016 मध्ये मेधाने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. तिने शादिस्तान, बेकघम पॅलेस, दिल बेकरार आणि बारवी फेल या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. बारवी फेल या चित्रपटामुळेच तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतोय.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Medha Shankr (@medhashankr)

बारवी फेल हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट सध्या ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळेल. यामध्ये विक्रांत मेस्सी, मेधा शंकर, संजय बिश्नोई आणि हरीश खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 66.58 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये मेधाने मनोज यांच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे.

बारवी फेल या चित्रपटाचं केवळ प्रेक्षक-समिक्षकांकडून नाही तर सेलिब्रिटींकडून कौतुक झालं आहे. कमल हासन, ऋषभ शेट्टी, संजय दत्त, फरहान अख्तर, अनिल कपूर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी या चित्रपटाची आणि त्यातील कलाकारांची प्रशंसा केली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.