मोनालिसा आहे की ऐश्वर्या राय? महाकुंभातील व्हायरल गर्लचे फोटो व्हायरल, उंचावतील भुवया
मोनालिसा आहे की ऐश्वर्या राय? महाकुंभातील व्हायरल गर्लचं चमकलं नशीब, मेकअप शूटमध्ये दिसते क्लासी, फोटो पाहून उंचावतील भुवया..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त व्हायरल गर्ल मोनालिसाच्या सौंदर्याच्या चर्चा...

Mahakumbh 2025 Viral Girl Monalisa: महाकुंभातील व्हायरल गर्ल मोनालिसा (Mahakumbh Viral Girl Monalisa) चं नाव समोर आलं की, तिचे सुंदर डोळे समोर येतात. मोनालिसाच्या सुंदर डोळ्यांनी अनेकांना घायाळ केलं आहे. एका रात्रीत सौंदर्यांमुळे प्रसिद्धी झोतात आलेली मोनालिसा पुन्हा एका फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. एवढंच नाही तर, मोनालिसा हिला सिनेमांमधून ऑफर यायला देखील सुरुवात झाली आहे. मोनालिसाला नुकताच सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून संधी मिळाली आहे, त्यामुळे ती मुंबईत असल्याची माहिती मिळत आहे.
मोनालिसा हिचं मेकअप शूट देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये मोनालिसा सुंदर दिसत आहे. फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी मोनालिसा हिची तुलना अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत केली आहे.
90 च्या दशकात ऐश्वर्या जशी दिसत होती, तशीच आता मोनालिसा दिसत आहे… अशा कमेंट नेटकरी मोनालिसा हिच्या फोटोंवर करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मोनालिसा हिची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.




कोण आहे मोनालिसा?
महाकुंभ मेळा 2025 सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये मोनालिसा ही एक साधी मुलगी देखील आहे जी तुफान चर्चेत आहे आणि संपूर्ण सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओ आणि फोटोंची चर्चा रंगली आहे. तिचं पूर्ण नाव मोनालिसा भोसले असं आहे. कुंभमेळ्यात कुटुंबासोबत हार विकण्यासाठी आलेली मोनालिसा एका रात्रींत स्टार झाली आहे . सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
एवढंच नाही तर, तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेक जण तिच्या भोवती गर्दी करत आहेत. ज्यामुळे मोनालिसाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मोनालिसा भोवती गर्दी जमली होती आणि तिच्या बचावासाठी तिचं कुटुंब पुढे आलं. आता सोशल मीडियामुळे स्टार झालेल्या मोनालिसाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.