Uorfi Javed | चक्क अशाप्रकारे केला उर्फी जावेद हिने मणिपूरच्या घटनेचा निषेध, नेटकरी म्हणाले, आम्ही तुझ्यासोबत…
उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. नेटकऱ्यांच्या निशाण्यावर उर्फी जावेद असते. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने मोठी खंत व्यक्त करत खुलासा केला होता. इतकेच नाही तर उर्फी जावेद म्हणाली होती की, मी आता परत येऊ शकत नाही. कारण मला कोणतेच कुटुंबिय स्वीकारणार नाहीये.
मुंबई : उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही उर्फी जावेद हिची बघायला मिळते. कायमच आपल्या चाहत्यांसाठी अत्यंत बोल्ड फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना उर्फी जावेद ही दिसते. अनेकदा उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे जोरदार टिका ही केली जाते. मात्र, होणाऱ्या टिकेचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर होत नाही. इतकेच नाही तर थेट तिच्या कपड्यांमुळे उर्फी जावेद हिला जीवे मारण्याच्या धमक्या (Threats) या देखील मिळाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच पापाराझी यांना बॅग वाटप करताना उर्फी जावेद ही दिसली होती. अनेकांनी उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून तिचे काैतुक करण्यास देखील सुरूवात केली होती. उर्फी जावेद ही कोट्यावधी संपत्तीची मालकीन असून मुंबईमध्ये उर्फी जावेद हिचे आलिशान घर देखील आहे. उर्फी जावेद ही सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यावधी रूपये कमावते.
नुकताच आता उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ही मणिपूरच्या घटनेचा निषेध नोंदवताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने केसांना लाल रंग दिल्याचे दिसत आहे. माणिपूरच्या घटनेचे एक फलक देखील उर्फी जावेद हिने हातामध्ये घेतल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत म्हटले की, आम्ही तुझ्यासोबत आहोत.
Urfi Javed takes a strong stand on Manipur Case. ?@uorfi_ #urfijaved #Manipur #ManipurCrisis #ManipurViolence pic.twitter.com/ayz4tHJmdN
— E24 (@E24bollynews) July 20, 2023
आता याचेच काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी उर्फी जावेद हिचे समर्थन देखील केले आहे. मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये संतापाचे वातावरण हे बघायला मिळत आहे. अनेक बाॅलिवूड स्टारने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. आरोपींनी कठोर शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आलीये.
मणिपूर हिंसाचारातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांच्या पायाखालची जमीन हादरली. कारण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, दोन महिलांना नग्न करून फिरवले जात आहे. या व्हिडीओ पाहून संतापाची लाट आल्याचे देखील दिसत आहे. अनेकांनी यावरून सरकारला टार्गेट केले आहे. यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाष्य केले आहे.