Tabu: अजय देवगणमुळे वयाच्या 52 व्या वर्षीही तब्बू सिंगल? नेमकं काय घडलं?

तब्बूने 'या' कारणामुळे आजपर्यंत केलं नाही लग्न; मुलाखतीत केला खुलासा

Tabu: अजय देवगणमुळे वयाच्या 52 व्या वर्षीही तब्बू सिंगल? नेमकं काय घडलं?
Tabu and Ajay DevgnImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 5:00 PM

मुंबई- हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री तब्बू आज (शुक्रवार) 52 वा वाढदिवस साजरा करतेय. ‘हम नौजवान’ या चित्रपटातून तब्बूने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. आज बॉलिवूडच्या दमदार अभिनेत्रींमध्ये तब्बूचं नाव आवर्जून घेतलं जातं. तब्बूने लग्न न करण्याबद्दल अनेकदा अभिनेता अजय देवगणला जबाबदार ठरवलं जातं. मात्र असं का, ते जाणून घेऊयात..

अभिनेत्री म्हणून तब्बूने 1994 मध्ये ‘पहला पहला प्यार’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. मात्र तिला खरी ओळख ‘विजयपथ’ या चित्रपटातून मिळाली. तब्बूचं खरं नाव तबस्सुम फातिमा हाश्मी आहे. देव आनंद यांनी तबस्सुमला तब्बू असं नाव दिलं. ‘हम नौजवान’ या चित्रपटातील तिचं अभिनय पाहून ते खूप प्रभावित झाले होते.

तब्बू आणि संजय कपूर यांनी ‘प्रेम’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. मात्र काही काळानंतर दोघांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं. यामागचं कारण आजपर्यंत कोणालाच कळू शकलं नाही.

तब्बूचं नाव दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनशीही जोडलं गेलं होतं. त्यावेळी नागार्जुन हे विवाहित होते. या दोघांचं अफेअर जवळपास 15 वर्षे चाललं होतं. मात्र नागार्जुन पत्नीला सोडायला तयार नसल्याने अखेर तब्बूने नात्यातून माघार घेतली.

View this post on Instagram

A post shared by Tabu (@tabutiful)

तब्बूने आजपर्यंत कोणाशी लग्न केलं नाही. तिच्या मते यामागचं कारण अभिनेता अजय देवगण आहे. एका मुलाखतीत तिने सांगितलं, “मी जेव्हा लहान होती, तेव्हा माझा चुलत भाऊ समीर आणि अजय माझा सतत पाठलाग करायचे. माझ्याशी कोणत्याही मुलाने बोलायला सुरुवात केली, तर ते त्याला मारायचे. त्यांच्यामुळेच मी आजपर्यंत सिंगल आहे.”

तब्बू आणि निर्माते साजिद नाडियादवाला यांचंही अफेअर चर्चेत होतं. जेव्हा साजिदची पत्नी दिव्या भारतीचं निधन झालं, तेव्हा तब्बूने त्यांना आधार दिला असं म्हटलं जातं. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. बऱ्याच काळापर्यंत या दोघांनी नातं माध्यमांपासून लपवून ठेवलं होतं. मात्र हे नातंसुद्धा फार काळ टिकलं नाही.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.