KBC | ‘केबीसी’मध्ये जिंकलेले 5 कोटी रुपये गमावले, व्यसनाधीन झाला अन् आता करतोय ‘हे’ काम

2011 मध्ये KBC च्या पाचव्या सीझनमध्ये सुशील कुमार या स्पर्धकाने पाच कोटी रुपये जिंकले होते. मात्र बिहारच्या सुशील कुमारने या रकमेचा योग्य वापर करू शकला नाही आणि काही वेळातच त्याने सर्व पैसे गमावले.

KBC | 'केबीसी'मध्ये जिंकलेले 5 कोटी रुपये गमावले, व्यसनाधीन झाला अन् आता करतोय 'हे' काम
KBC winner Sushil KumarImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 3:26 PM

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या प्रत्येक सीझनमध्ये अनेक स्पर्धकांनी रक्कम जिंकली. 2011 मध्ये KBC च्या पाचव्या सीझनमध्ये सुशील कुमार या स्पर्धकाने पाच कोटी रुपये जिंकले होते. मात्र बिहारच्या सुशील कुमारने या रकमेचा योग्य वापर करू शकला नाही आणि काही वेळातच त्याने सर्व पैसे गमावले. 2020 मध्ये त्याने फेसबुकवर पोस्ट लिहीत स्वतःची व्यथा सांगितली होती.

KBC मध्ये 5 कोटी रुपये जिंकल्यानंतर अनेकांनी आपली फसवणूक केल्याचं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं होतं. त्याने काही पैसे सामाजिक कार्यासाठी देण्याचा प्रयत्न केला. मात्र याच प्रयत्नात त्याच्या अवतीभवती असलेल्या काही लोकांनी त्याची फसवणूक केली.

“केबीसीनंतर मी परोपकाराची अनेक काम केली. गुप्तपणे दान करण्याचं जणू व्यसनच मला लागलं होतं. त्यावेळी एका महिन्यात मी जवळपास 50 हजार कार्यक्रमांना हजेरी लावायचो. यामुळे अनेकदा लोकांनी माझी फसवणूक केली. पैसे दान केल्यानंतर मला या फसवणुकीबद्दल समजायचं. यामुळे पत्नीसोबतचं नातं बिघडू लागलं होतं. योग्य आणि अयोग्य लोकांमधील फरक मी समजू शकत नाही, असं तिचं म्हणणं होतं. कुटुंबाच्या भविष्याचा विचार करत नसल्याचा आरोप तिने माझ्यावर केला. त्यावरून अनेकदा आमची भांडणं व्हायची”, असं सुशील कुमारने लिहिलं होतं.

हे सुद्धा वाचा

जेव्हा दिवाळखोरीच्या बातम्या येऊ लागल्या तेव्हा लोकांनी आपल्याला कार्यक्रमांना बोलावणं थांबवलं, असंही सुशीलने स्पष्ट केलं. “एकेदिवशी सहज फिरत असताना मला एका इंग्रजी वर्तमानपत्राचा पत्रकार भेटला. त्याने मला काही प्रश्न विचारले. एका प्रश्नामुळे मी थोडा चिडलो आणि त्याला सहज सांगितलं की माझ्याकडे असलेले सर्व पैसे संपले आहेत. मी सध्या दोन गाई पाळतोय आणि गाईचं दूध विकून घराचा गाडा चालवतोय. त्यानंतर ही बातमी छापली गेली आणि सर्वत्र त्याची चर्चा झाली. माझ्याकडचे पैसे संपल्याचं कळताच लोकांनी मला कार्यक्रमांना बोलावणं बंद केलं. त्यावेळी पुढे नेमकं काय करावं हे विचार करण्यासाठी मला थोडा वेळ मिळाला”, असं त्याने पुढे लिहिलं.

या काळात सुशील कुमारचा संपर्क जामिया मिलिया, IIMC, JNU मध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांशी आला. त्याची ओळख काही थिएटर कलाकारांशीही झाली. मात्र हे विद्यार्थी जेव्हा एखाद्या विषयावर बोलायचे, तेव्हा सुशीलवर दडपण यायचं. त्याविषयी आपल्याला फार काही माहीत नसल्याची भीती त्याला होती. याच भीतीतून हळूहळू तो दारुच्या व्यसनाकडे वळला. सध्या सुशील एक शिक्षक म्हणून काम करतोय. त्याने बॉलिवूडमध्येही नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश मिळालं नाही.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.