हा प्रसिद्ध अभिनेता करणार ‘मी होणार सुपरस्टार: छोटे उस्ताद 3’चं सूत्रसंचालन

'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'चं तिसरं पर्व येत्या 13 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता हा कार्यक्रम स्टार प्रवाह वाहिनीवर पहायला मिळेल.

हा प्रसिद्ध अभिनेता करणार 'मी होणार सुपरस्टार: छोटे उस्ताद 3'चं सूत्रसंचालन
'मी होणार सुपरस्टार: छोटे उस्ताद'च्या तिसऱ्या पर्वात काय असेल नवीन? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 4:25 PM

‘मी होणार सुपरस्टार: छोटे उस्ताद’चं तिसरं पर्व येत्या 13 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. पहिल्या पर्वातही सिद्धार्थने सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती. तिसऱ्या पर्वात पुन्हा एकदा ही जबाबदारी नव्याने पेलण्यासाठी सिद्धार्थ सज्ज आहे. सिद्धार्थचा हजरजबाबीपणा सर्वांनाच परिचित आहे. यंदाच्या पर्वात सिद्धार्थचा सिद्धांतही पाहायला मिळेल. जगातला असा कोणताच प्रॉब्लेम नाही ज्यावर सिद्धार्थचा सिद्धांत तोडगा देऊ शकत नाही.

जेव्हा जेव्हा स्पर्धकांना स्पर्धेत काय करायचं? पुढे कसं जायचं? असे प्रश्न सतावतील तेव्हा सिद्धार्थचे सिद्धांत मदतीला धावतील. सिद्धार्थचे सिद्धांतं फक्त स्पर्धकांची अडचण सोडवण्यासाठीच नाही तर प्रेक्षकांना सुद्धा जीवनभराचं ज्ञान देऊन जातील. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी तुम्ही या सिद्धांतांचा वापर करून तुमचं जगणं सोपं आणि समृद्ध करू शकता. त्यामुळे ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’च्या या तिसऱ्या पर्वात काय मिळणार? या प्रश्नावर सिद्धार्थचा सिद्धांत सांगतो…सुरेल गाणी, परीक्षकांची टिपण्णी, यासोबतच ऐकायला मिळणार सिद्धार्थची सिद्धांत वाणी.

हे सुद्धा वाचा

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ हा कार्यक्रम सिद्धार्थसाठी खूपच खास आहे. या कार्यक्रमाविषयी सांगताना सिद्धार्थ म्हणाला, “पहिलं पर्व जेव्हा मी केलं, तेव्हा सगळ्या छोटया उस्तादांच्या आणि परीक्षकांच्या मी प्रेमात पडलो. परीक्षक ज्याप्रकारे काळजीने त्या लहान मुलांशी बोलतात, चांगल्या गोष्टी समजावून सांगतात तेव्हा खरंच असं वाटतं की हे फक्त टीव्ही शोजचे जज नाही तर खरंच गुरू आहेत. ज्यांचा अनुभव आणि ज्ञान खूप मोलाचं आहे. कार्यक्रमात कुठेही औपचारिकता नाही. आमचं छान कुटुंब तयार झालं आहे. या मंचावर संपूर्णपणे मराठी गाणी ऐकायला मिळतात.”

“स्पर्धक मंचावर अशी गाणी सादर करतात जी त्यांच्या जन्माच्या कित्येक वर्ष आधी आली असतील. तरीसुद्धा त्यांच्या तोंडपाठ आहेत. ही जुनी-नवी सगळी गाणी या लहान मुलांकडून जर का नव्या पिढीपर्यंत पोहोचणार असतील तर याहून चांगली गोष्ट नाही. सूत्रसंचालक म्हणून माझं काम हेच आहे की सगळ्या छोट्या उस्तादांचा मोठा भाऊ व्हायचं. सोबतीला माझे सिद्धांत पण असतीलच. जेव्हा जेव्हा टेन्शनचं वातवरण असेल तेव्हा माझे सिद्धांत येतील आणि माहोल हलकाफुलका करतील.”

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.