‘आई कुठे काय करते’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीची एण्ट्री

'या' अभिनेत्रीच्या एण्ट्रीने अरुंधती-आशुतोषच्या नात्यात येणार नवं वळण; मालिकेत मोठा ट्विस्ट

'आई कुठे काय करते' मालिकेत होणार 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीची एण्ट्री
'आई कुठे काय करते' मालिकेत होणार 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीची एण्ट्रीImage Credit source: Hotstar
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 11:38 AM

मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने दमदार कथानकामुळे आणि कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेचं कथानक आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आशुतोषच्या वाढदिवसी अरुंधती त्याच्याबाबत मोठा निर्णय घेणार होती. मात्र अनुष्काच्या एण्ट्रीने अरुंधतीला तिच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे. अनुष्का ही आशुतोषची खूप जुनी मैत्रीण आहे. बऱ्याच वर्षांनंतर या दोघांची पुन्हा भेट होणार आहे. त्यामुळे तिच्या एण्ट्रीने मालिकेत मोठा ट्विस्ट येणार हे नक्की.

या मालिकेत अनुष्काची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरांगी मराठे साकारणार आहे. या भूमिकेबद्दल स्वरांगी म्हणाली, “मी या मालिकेची खूप मोठी चाहती आहे. खऱ्या आयुष्यात मी दोन मुलांची आई असल्यामुळे ‘आई काय करू शकते’ याचा अनुभव मी घेतच आहे. त्यामुळे मला जेव्हा अनुष्काच्या भूमिकेसाठी विचारलं गेलं, तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

“कुटुंबीयांची साथ असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नसते. तू सध्या काय करतेय हा प्रश्न मला गेल्या कित्येक दिवसांपासून विचारला जायचा. आता मी अभिमानाने सांगू इच्छिते की मी लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अनुष्का ही भूमिका साकारतेय.”

स्वरांगीच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुखने तिची सेटवर सर्वांची ओळख करून दिली. सेटवर खूपच सकारात्मक वातावरण असल्याचं स्वरांगीने यावेळी सांगितलं.

अनुष्काच्या एण्ट्रीने अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात कोणतं वळण येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.