फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? शाहरुखसोबत 1100 कोटींचा सिनेमा, 27 व्या वर्षी धर्मपरिवर्तन

या फोटोमध्ये वडिलांसोबत दिसणाऱ्या या चिमुकल्या मुलीला ओळखलंत का? आज ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने शाहरुख खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाने तब्बल 1100 कोटींची कमाई केली होती.

फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? शाहरुखसोबत 1100 कोटींचा सिनेमा, 27 व्या वर्षी धर्मपरिवर्तन
फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का?Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 22, 2024 | 2:01 PM

या फोटोमध्ये वडिलांसोबत दिसणारी गोड मुलगी आता मोठी झाली असून सिनेसृष्टीत चांगलं नाव कमावत आहे. या अभिनेत्रीने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारून आघाडीचं स्थान पटकावलं आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या साऊथच्या अभिनेत्रींमध्ये तिचा आवर्जून समावेश होतो. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील यशानंतर नुकतंच या अभिनेत्रीने शाहरुख खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या पहिल्यावहिल्या बॉलिवूड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. या चित्रपटाला तब्बल 1100 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवण्यात यश मिळालं. जर तुम्ही अजूनही या अभिनेत्रीला ओळखू शकला नसाल तर आम्ही तुमची मदत करतो. तिचा चेहरा बघून तुम्ही अंदाज लावू शकता की फोटोतील निरागस चेहऱ्याची ही मुलगी आजच्या काळातील यशस्वी अभिनेत्री बनली आहे.

ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आहे. नयनताराची गणना साऊथच्या सुपरस्टार्समध्ये केली जाते. बॉलिवूडमध्येही तिची डिमांड वाढली आहे. शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटातून तिने कमाल केली होती. नयनताराचं खरं नाव डायना मरियम कुरियन असं आहे. तिने अभिनयक्षेत्रातील प्रवासाची सुरुवात 2003 मध्ये ‘मनासीनाकाडे’ या मल्याळम चित्रपटातून केली. मल्याळम भाषेत काही चित्रपटं केल्यानंतर तिने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. ‘अय्या’ हा तिचा पहिला तमिळ चित्रपट आहे. त्यानंतर तिने कन्नड भाषेतील चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. 2011 मध्ये ‘श्री राम राज्यम’ या तेलुगू चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

हे सुद्धा वाचा

2011 पूर्वी नयनतारा ख्रिश्चन होती. 2011 मध्ये तिने ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. तिचं नाव एकेकाळी प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक प्रभू देवाशी जोडलं गेलं होतं. प्रभूदेवाशी लग्न करण्यासाठीच तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचं म्हटलं जातं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. नयनताराने 2022 मध्ये निर्माता विग्नेश शिवनशी लग्न केलं. त्यानंतर हे दोघं सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा बनले. त्यांना जुळी मुलं आहेत. नयनतारा ही सध्याच्या घडीची साऊथमधील अत्यंत महागडी अभिनेत्री आहे. एका चित्रपटासाठी ती 20 ते 25 कोटी रुपये मानधन स्वीकारते. ‘फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी’च्या यादीत नयनतारा ही दक्षिणेतील एकमेव महिला अभिनेत्री आहे, जिची संपत्ती तब्बल 200 कोटींच्या घरात आहे.

Non Stop LIVE Update
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....
'राज ठाकरेंनी चर्चेविना उमेदवार उभे केले म्हणून...',शिंदे स्पष्ट बोलले
'राज ठाकरेंनी चर्चेविना उमेदवार उभे केले म्हणून...',शिंदे स्पष्ट बोलले.