Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनील शेट्टीच्या अभिनेत्रीने लग्नासाठी सोडलं यशस्वी करिअर; घटस्फोटानंतर वयाच्या चाळिशीत मिळालं दुसरं प्रेम

पूजा आता मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी एक काळ असा होता जेव्हा तिची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जात होती. तिने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सुनील शेट्टीच्या अभिनेत्रीने लग्नासाठी सोडलं यशस्वी करिअर; घटस्फोटानंतर वयाच्या चाळिशीत मिळालं दुसरं प्रेम
Pooja BatraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 1:01 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्यांच्याकडे पाहून वय हा केवळा आकडा आहे असं वाटतं. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरही या अभिनेत्री फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींनाही टक्कर देतात. फोटोत दिसणारी ही अभिनेत्री नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होती. मात्र आजही तिच्या सौंदर्यात तसूभरही कमतरता नाही. या अभिनेत्रीने 1993 मध्ये ‘फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल’ या सौंदर्यस्पर्धेत विजेतेपद पटकावलं होतं. 1997 मध्ये ‘भाई’ या चित्रपटात तिने अभिनेता सुनील शेट्टीसोबत भूमिका साकारली होती. त्यावेळी ती अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री होती. आतापर्यंत तुम्हाला या अभिनेत्रीचं नाव ओळखता आलंच असेल. तर ही अभिनेत्री आहे पूजा बत्रा.

पूजा बत्रा आजही सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना मात देते. तिचा जन्म 27 ऑक्टोबर 1976 रोजी उत्तरप्रदेशातील फैजाबादमध्ये झाला. 1997 मध्ये तिने ‘विरासत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याशिवाय ती 1997 मध्ये ‘चंद्रलेखा’ या मल्याळम चित्रपटातही झळकली. 1998 मध्ये तिने ‘ग्रीकू वीरुडू’ या तेलुगू चित्रपटात आणि त्यानंतर काही पंजाबी चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत. फेमिना मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेची रनरअप ठरलेली पूजाने 1993 मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला होता. तर 1993 च्या मिस इंटरनॅशनल सौंदर्यस्पर्धेत तिने भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Nawab Shah (@nawwabshah)

पूजाने 2002 मध्ये डॉक्टर सोनू आहलुवालियाशी लग्न केलं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नाच्या आठ वर्षांनंतर सोनू आणि पूजाचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2019 मध्ये तिने अभिनेता नवाब शाहशी दुसरं लग्न केलं. नवाबबद्दल बोलताना पूजा म्हणाली होती की, “आम्ही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून भेटलो. आम्ही आमच्या आयुष्याच्या योग्य वेळी भेटलो. त्याच परिस्थितीत आम्ही भावनिक होतो. आम्हाला एकमेकांना समजावून सांगण्याचा फारसा प्रयत्न करावा लागला नाही. मला त्याच्याबद्दलची सर्वात चांगली वाटणारी गोष्ट म्हणजे तो एक कौटुंबिक व्यक्ती आहे.

त्याच वेळी नवाब यांनी सांगितलं की, “हा सर्व एक जादूचा अनुभव होता. आम्ही 20 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि नंतर आम्ही पुन्हा कनेक्ट झालो. जे काही घडले ते आमच्यासाठी चांगलेच होते. ती लॉस एंजेलिसहून परत येत होती आणि आमची भेट झाली. मग आम्ही एकत्र वेळ घालवला आणि मग हळूहळू आमचा बॉन्ड वाढू लागला.”

पूजा आता मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी एक काळ असा होता जेव्हा तिची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जात होती. तिने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय जाहिरातींमध्येही तिने दीर्घकाळ काम केलं होतं. ‘हेड अँड शोल्डर्स’ या अमेरिकन शॅम्पूच्या जाहिरातीसाठी ती पहिली भारतीय चेहरा ठरली होती.

हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्...
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्....