‘बिग बॉस 18’मधील सर्वांत महागडा स्पर्धक; निर्मात्यांनी दिली इतकी मोठी रक्कम?

हिंदी बिग बॉसचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. एका अभिनेत्याला बिग बॉसच्या निर्मात्यांकडून मोठी ऑफर मिळाल्याचं कळतंय.

'बिग बॉस 18'मधील सर्वांत महागडा स्पर्धक; निर्मात्यांनी दिली इतकी मोठी रक्कम?
Dheeraj DhooparImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 15, 2024 | 3:08 PM

बिग बॉस टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो आहे. विविध भाषांमध्ये हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. मात्र हिंदी बिग बॉसची एक वेगळीच क्रेझ पहायला मिळते. अभिनेता सलमान खान या हिंदी बिग बॉसचं सूत्रसंचालन करतो. आता लवकरच हिंदी बिग बॉसचा अठरावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, याची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. बिग बॉसच्या स्पर्धकांसाठी वेगवेगळी नावं चर्चेत आहेत. टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय अभिनेता अठराव्या सिझनमध्ये सहभागी होणार असल्याचं कळतंय. इतकंच नव्हे तर तो या सिझनचा सर्वांत महागडा स्पर्धक असल्याचंही म्हटलं जातंय.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेत करण लुथराची भूमिका साकारणारा धीरज धूपर आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांकडून धीरजला मोठी ऑफर मिळाल्याचं कळतंय. लवकरच तो ‘बिग बॉस 18’मध्ये झळकणार असल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार, धीरजला जवळपास चार ते पाच कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे. धीरजसोबतच एलिस कौशिक, युट्यूबर आणि अभिनेत हर्ष बेनीवाल, नुसरत जहाँ, टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती, सोमी अली आणि करण पटेल यांनाही बिग बॉसची ऑफर मिळाल्याचं कळतंय. यापैकी कोणकोणते कलाकार बिग बॉसच्या घरात दिसतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

यंदाचा सिझन येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचं कळतंय. या आठवड्यात बिग बॉस 18 चा पहिला टीझरसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. यंदाच्या सिझनमध्ये काही जुने स्पर्धकसुद्धा दिसणार आहेत. इतकंच नव्हे तर सलमान खानसोबत माजी स्पर्धक अब्दु रोझिकसुद्धा शोचं सूत्रसंचालन करणार असल्याची चर्चा आहे.

कोण आहे धीरज धूपर?

‘ससुराल सिमर का’ या मालिकेत प्रेम भारद्वाज आणि ‘कुंडली भाग्य’मध्ये करण लुथराची भूमिका साकारून धीरज घराघरात पोहोचला. या भूमिकांसाठी त्याला बरेच पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. त्याने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. धीरजने अभिनेत्री विनी अरोराशी लग्न केलंय. ‘मात पिताह के चरणों मे स्वर्ग’ या मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली.

संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली.
बहिणींनंतर आता भाऊही लाडके... अजितदादांच्या 'त्या' जाहिरातीची एकच चर्च
बहिणींनंतर आता भाऊही लाडके... अजितदादांच्या 'त्या' जाहिरातीची एकच चर्च.
महायुती-मविआत चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?
महायुती-मविआत चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?.